मुंबई -आरोप रियाज भाटी मुंबई पोलिसांनी सोमवारी 26 सप्टेंबर रोजी अटक केल्यानंतर आज मंगळवार (दि. 27 सप्टेंबर)रोजी मुंबईतील किल्ला कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. सलीम फ्रुट्स हा तक्रारदाराला धमकी देऊन 62 लाख रुपयांची मागणी करत होता. तक्रारदाराकडे पैसे नसल्याने सलीम फ्रुटने तक्रारदाराची गाडी घेऊन गेली होता. कारची किंमत 30 लाख असून उर्वरित 32 लाखांसाठी छोटा शकीलच्या नावाने तक्रारदाराला धमकी देत होता. काही दिवसांनंतर जेव्हा एनआयएने सलीम फ्रूटला अटक केली. तेव्हा, दुसऱ्या एका प्रकरणात रियाझ भाटीने तक्रारदाराला फ्रूटच्या वतीने धमकवून पैशाची मागणी केली होती. त्यानंतर पीडितेने वर्सोवा पोलिसांत विरोधात एफआयआर दाखल केला आहे.
रियाझ भाटी यांच्या वतीने वकील तारिक सय्यद यांनी असा युक्तिवाद केला, की सलीम फ्रूट याने पोलीस कोठडीत सर्व आरोप व कारवाया केल्याचे सांगण्यात आले. या रियाझ भाटीची कोणतीही भूमिका नाही. रियाझ भाटी आणि सलीम फ्रुट हे फळांचे व्यापारी असून दोघेही एकमेकांसोबत व्यवसाय करत होते.
या प्रकरणी पोलिसांची पूर्ण रिमांड सलीम फ्रुट यांच्या विरोधात आहे. जो एनआयएच्या ताब्यात आहे, तो एनआयएकडून त्याची कस्टडी घेऊ शकतो, त्यांना भाटीच्या कोठडीची काय गरज आहे? असा प्रश्न देखील रियाझ भाटीच्या वकिलांकडून पोलिसांना करण्यात आला आहे. सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा नातेवाईक असून पोलिसांना या प्रकरणाचा फ्रूटकडून तपास करायचा आहे. मग रियाझ भाटीच्या कोठडीची काय गरज आहे? वकील तारक सय्यद यांनी म्हटले आहे.