महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Patra Chawl Mumbai : मुख्यमंत्री साहेब...! आम्हाला घर कधी मिळणार ?, पत्राचाळ रहिवाशांचा सवाल

पत्राचाळ ( Patra Chawl scam ) ही मुंबईतील गोरेगाव पश्चिम परिसरातील एक रहिवासी इमारत आहे. या इमारतीत एकूण अंदाजे 682 घर आहेत. तर राहणाऱ्या लोकांच्या संमतीनेच MHADA, गुरुआशिष या कंपन्यांमध्ये पुनर्विकासाचा एक करार झाला. या करारानुसार 13 एकर जागेमध्ये एक इमारत बांधण्यात येईल आणि यात पत्राचाळीमध्ये राहणाऱ्या 672 कुटुंबांना घर देण्यात येतील असे नमूद करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात या रहिवाशांना अद्यापही काहीच मिळालेले नसल्याचे चाळीतील नागरिकांचे मत आहे.

पत्राचाळीतील नागरिक
पत्राचाळीतील नागरिक

By

Published : Apr 20, 2022, 7:03 PM IST

मुंबई -मुंबईतील बहुचर्चित पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत यांचे सुरुवातीला नाव आले होते. 1034 कोटींचा हा घोटाळा झाला होता. याप्रकरणी तपास यंत्रणांकडून प्रवीण राऊत यांना ताब्यात घेण्यात आले होते. प्रवीण राऊत यांच्या प्राथमिक चौकशी संजय राऊत यांचे नाव समोर आले. पत्राचाळ ( Patra Chawl scam ) ही मुंबईतील गोरेगाव पश्चिम परिसरातील एक रहिवासी इमारत आहे. या इमारतीत एकूण अंदाजे 682 घर आहेत. तर राहणाऱ्या लोकांच्या संमतीनेच MHADA, गुरुआशिष या कंपन्यांमध्ये पुनर्विकासाचा एक करार झाला. या करारानुसार 13 एकर जागेमध्ये एक इमारत बांधण्यात येईल आणि यात पत्राचाळीमध्ये राहणाऱ्या 672 कुटूंबांना घर देण्यात येतील असे नमूद करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात या रहिवाशांना अद्यापही काहीच मिळालेले नसल्याचे चाळीतील नागरिकांचे मत आहे.


भाडे करार देखील झाला पण... :या पुनर्बांधणीच्या करारा सोबतच एक भाडे करार देखील झाला. या करारानुसार जोपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत विकासक म्हणजेच बिल्डर येथिल रहिवाशांचे भाडे भरतील, असे ठरवण्यात आले. पण ठरलेल्या करारानुसार 2015 पासून भाडे मिळत नसल्याची तक्रार सध्या रहिवासी करत आहेत. ?येथिल रहिवासी परेश चव्हाण सांगतात की, बिल्डरचे काम आहे इमारतीचे बांधकाम. पण, त्याच्यावर लक्ष ठेवण्याचे काम हे म्हाडाच आहे. 2010 साली येथिल जागेचा सर्वे झाला, त्यावेळी हा भूखंड 40 एकर इतका होता. याच जागेचा 2011 साली पुन्हा सर्वे झाला त्यावेळी तो 47 एकर इतकी जागा असल्याचे पुढे आले. म्हणजे जवळपास सात एकर जागा वाढली. हा सुद्धा म्हाडाचा एक घोटाळा होता. आपली जागा किती आहे हे म्हाडाला माहिती नाही का ? असा सवालही नागरिकांनी व्यक्त केला.

हा आहे घोटाळा :2011 साली एक ट्राय पार्टी मोडिफिकेशन झाले आणि त्यानुसार म्हाडाने या बिल्डर ना जागा विकण्याची व बँकांकडून कर्ज घेण्याची देखील मुभा दिली. ही मुभा दिल्याने विकासकांनी जवळ जवळ 1064 कोटींचे लोन घेतले. 1039 करोड त्यांनी नऊ विकासकांना भाग करून ही जागा दिली. हे भाग करून विकले त्याचीच सध्या चौकशी सुरू आहे. हा सर्व घोटाळा जेव्हा होता. त्यावेळी म्हाडाचे अधिकारी काय करत होते ? त्यावेळी झेंडे गवई हे आयएएस ऑफिसर होते ही लोकं काय करत होती ? मागच्या सरकारच्या काळात जॉनी जोसेफ यांची एक सदस्यीय समिती स्थापन करून या सर्व प्रकरणाची चौकशी लावली आणि या समितीने या सर्व अधिकाऱ्यांना क्लिनचिट दिली. म्हणजे हा घोटाळा झालाच नाही का ? हे क्लीनचिट देणारे मागच्या सरकारमधील कोण होते ? आजच्या घडीला येथे कल्पतरू, गुरुवाशिषच्या तीस तीस माळ्याच्या इमारती उभे आहेत. आमची फक्त सहा माळ्याची बिल्डिंग देखील अद्याप पूर्ण झालेली नाही, असे येथिल रहिवासी सांगतात.



मुख्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासन :येथिल रहिवासी सांगतात की, 22 फेब्रुवारी 2022 रोजी पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शरद पवार व ग्रामीण गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड याठिकाणी आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थिती लावली. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. 2024 पर्यंत आम्हाला आमची घरे मिळतील असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, अद्याप देखील काम सुरू न झाल्याने ही घरे नेमकी कधी मिळतील हाच प्रश्न आहे. आम्ही म्हाडाला आणखी आठ दिवस देतो. म्हाडाने योग्य सहकार्य करावे अन्यथा आम्हाला पुन्हा एकदा म्हाडाच्या कार्यालयावर मोर्चे काढावे लागतील, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

हेही वाचा -VIDEO : 'चंद्रकांत पाटील हे मुक्त विद्यापीठ', ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांचा मिश्किल टोला

ABOUT THE AUTHOR

...view details