मुंबई - पारबंदर प्रकल्पाच्या (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) समुद्रातील पुलाच्या पहिला गाळा उभारणी कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी उपस्थित होते. मुंबई पारबंदर प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे २२ किमी लांबीच्या ६ पदरी (३ अधिक ३ मार्गिका) पुलाचा अंतर्भाव आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प वेळे आधी पूर्ण होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक समुद्रातील पुलाच्या पहिला गाळा उभारणी शुभारंभ मुख्यमंत्र्याच्या हस्ते पार पडला. या वेळी त्यांनी हा प्रकल्प वेळी आधी पूर्ण होइल असा विश्वास व्यक्त केला.
या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे १६.५ कि.मी. आहे. जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे ५.५ किमी इतकी आहे. एकूण 22 किमी लांबीचा पूल हा देशातील सर्वात जास्त लांबीचा समुद्रावरील पूल ठरणार आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा हा प्रकल्प आहे. प्रकल्प कधी पूर्ण होणार याबाबत लोकांच्या मनात शंका होती. मात्र, आज मी स्वतः प्रकल्प पहिला प्रकल्प निश्चितपणे वेळेआधी पूर्ण होईल. पर्यावरणाच्या दृष्टीने सर्व काळजी घेण्यात आली आहे. मी स्वतः फ्लेमिंगो पाहिले त्यामुळे प्रकल्प निश्चितपणे निसर्ग संवर्धक आहे, असे मला वाटते असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण आयुक्त आर ए राजीव यांनी प्रकल्प पर्यावरण पूरक असून सर्व निसर्ग संवर्धनाच्या बाबी लक्षात घेऊन पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न असल्याचे सांगितले. मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण उपआयुक्त संजय खंदारे यांनी मुंबई शहरात येण्यासाठी यापूर्वी लागणारे अडीच तासांचे अंतर आरध्यावर येईल, फ्लेमिंगो आणि मत्स्यसंवर्धनासाठी प्रकल्पांमध्ये आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्याचे त्यांनी सांगितले.