मुंबई - मुंबई महापालिकेच्या माझगाव येथील मालकीच्या असलेल्या भूखंडावर बेस्ट कर्मचाऱ्यांची वसाहत ( Land for Best Employees at mazgaon )उभारण्यात आली आहे. सन २०१४ - ३४ च्या आराखड्यानुसार या वसाहतीच्या ठिकाणी रुग्णालयालासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. या आरक्षणामुळे बेस्ट उपक्रमाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर बेघर होण्याची वेळ ( issue of BEST employees homes ) येणार आहे.
बेस्ट उपक्रमाने माझगाव येथील मालकीचा भूखंड पालिकेला हस्तांतरीत करण्यासाठीचा ( BMC proposal of BEST land ) प्रस्ताव तयार केला आहे. मुंबई महापालिका सभागृहात मंजुरीसाठी सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर न झाल्यास कर्मचाऱ्यांना आपली घरे खाली करावी लागणार ( BEST employees homes in Mazgaon ) आहेत.
हेही वाचा-Forest Department Action : वनविभागाची मोठी कारवाई; रानडुक्कर दात, साळींदरचे काटे, इंद्रजाल साठा जप्त
आरक्षण बदलले -
माझगाव येथे पी डि मेलो मार्गावरील 378.31 चौरस मीटरच्या भुखंड 1928 मध्ये बेस्ट उपक्रमाने पालिकेकडून 40 रुपये प्रती चौरस यार्ड या दराने भाड्याने घेतला आहे. 1965 पासून येथे अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. येथे सहा सदनिका आहेत. तसेच विद्युत वितरण उपकेंद्र, दोन दुकाने आणि तळमजल्यावर विद्युत देयक जमा केंद्र आहे. 1991 च्या पालिकेच्या विकास आराखड्यात हा भूखंड अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी आरक्षित होता. मात्र, पालिकेने 2014-34 या 20 वर्षाचा आरखडा तयार केला आहे. या विकास आराखड्यात हा भूखंड रुग्णालयासाठी आरक्षित केला आहे.