महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मध्य रेल्वेची 'किसान रेल्वे' ठरतेय विकासाचे इंजिन; 2.8 लाख टन नाशवंत वस्तूंची वाहतूक!

किसान रेल्वेद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मोठ्या बाजारपेठांसह चांगले उत्पन्न मिळते. मालाला चांगली किंमत, जलद वाहतूक, कमीत कमी अपव्यय यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात शेतीपूरक अनुकूल बदल झाला आहे. किसान रेल ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांसाठी भरभराटीचे इंजिन बनत असल्याचे सांगण्यात येत आहे.

मध्य रेल्वे
मध्य रेल्वे

By

Published : Sep 21, 2021, 5:09 PM IST

मुंबई - भारतीय रेल्वेने शेतकर्‍यांसाठी सुरु केलेल्या किसान रेल्वेला महाराष्ट्रातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. मध्य रेल्वेवर सुरू झालेली भारताची पहिली किसान रेल आता ट्रेंड सेटर बनली आहे. मध्य रेल्वेवरून ६०० किसान रेल्वेच्या फेऱ्या झाल्या आहेत. या फेऱ्यांमधून संपूर्ण देशभरात 2 लाख 8 हजार टन वजनी फुले, फळे व भाज्या यांसारख्या नाशवंत पदार्थांची वाहतूक करण्यात आली आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर २०२१ रोजी सांगोला ते मुजफ्फरपूरपर्यंत ६०० वी किसान रेल्वे मध्य रेल्वेने चालविली. मध्य रेल्वेतून ६०० वी फेरी पूर्ण करत किसान रेल्वे शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी पुढे नेणारा सर्वात यशस्वी आणि सर्वात मोठा गेम चेंजर उपक्रम ठरला. जलद वाहतूक, शून्य अपव्यय, ५० टक्के अनुदानासह शेती उत्पादनांसाठी मोठ्या आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश सुनिश्चित करून किसान रेल्वेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये नवीन आशा आणली आहे.

हेही वाचा-'मिस पिंपरी-चिंचवड'च्या मानकरी ठरलेल्या विशाखा यांची गळफास घेऊन आत्महत्या

पहिली किसान रेल्वे ७ ऑगस्ट २०२० रोजी सुरू झाल्यापासून मध्य रेल्वेकडून किसान रेल्वेच्या ६०० फेऱ्यांमध्ये २ लाख ८ हजार ३७८ टन नाशवंत वस्तूंची वाहतूक करण्यात आली. मध्य रेल्वेला ७ ऑगस्ट २०२० रोजी पहिली किसान रेल आणि २८ डिसेंबर २०२० रोजी किसान रेल्वेची १०० वी फेरी चालवण्याचा गौरव प्राप्त झाला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेबलिंकद्वारे १०० व्या किसान रेलला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. किसान रेल्वेची ५०० वी फेरी १२ ऑगस्ट २०२१ रोजी चालविण्यात आली.

हेही वाचा-खटला इतर न्यायालयात चालवण्याची मागणी करण्याचा सामान्य नागरिकांना अधिकार - अॅड नितीन सातपुते


महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी समृद्धीचे इंजिन -

सोलापूर भागातून डाळिंब, द्राक्षे, लिंबू, शिमला मिर्च; लातूर आणि उस्मानाबाद भागातून फुले, नाशिक भागातून कांदा, भुसावळ व जळगाव भागातून केळी, नागपूर भागातून संत्री व इतर फळे आणि भाज्या दिल्ली, बिहार, पश्चिम बंगालसारख्या दूरच्या बाजारपेठांमध्ये लवकर पोहोचतात. किसान रेल्वेद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मोठ्या बाजारपेठांसह चांगले उत्पन्न मिळते. मालाला चांगली किंमत, जलद वाहतूक, कमीत कमी अपव्यय यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात शेतीपूरक अनुकूल बदल झाला आहे. किसान रेल ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांसाठी भरभराटीचे इंजिन बनत असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा-सैन्यदलाचे चॉपर जम्मूमधील घनदाट जंगलात कोसळले...दोन्ही वैमानिकांचा मृत्यू

महाव्यवस्थापकांनी केले कौतुक -

सरकारने 'ऑपरेशन ग्रीन - टॉप टू टोटल' या 'आत्मनिर्भर भारत' अभियानाच्या अंतर्गत सरकारच्या धोरणाचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानदेखील वाढविले आहे. यामुळे रेल्वे शेतकऱ्यांच्या वाहतुकीसाठी पहिली पसंती बनली आहे. किसान रेल्वेच्या ६०० फेऱ्या यशस्वीपणे चालविण्याऱ्या मध्य रेल्वे टीमच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. मध्य रेल्वे सध्या देवळाली -मुजफ्फरपूर, सांगोला -मुझफ्फरपूर, सांगोला -आदर्श नगर दिल्ली, सांगोला -शालीमार, रावेर -आदर्श नगर दिल्ली आणि सावदा -आदर्श नगर दिल्ली अशा ६ किसान रेल्वे चालवित असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details