महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 13, 2022, 9:37 AM IST

ETV Bharat / city

भरधाव कारने पादचाऱ्यांना उडवले, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ लिपिकाचा मृत्यू

मुंबईतील कफ परेड परिसरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरजवळ भरधाव गाडीने ( Car hit pedestrian at cuffe parade area ) पादचाऱ्यांना उडवले. हा भीषण अपघात काल दुपारी घडला. या अपघातात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ लिपिक प्रसेनजीत धाडसे यांचा मृत्यू झाला आहे.

accident
अपघात

मुंबई -मुंबईतील कफ परेड परिसरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरजवळ भरधाव गाडीने ( Car hit pedestrian at cuffe parade area ) पादचाऱ्यांना उडवले. हा भीषण अपघात काल दुपारी घडला. या अपघातात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ लिपिक प्रसेनजीत धाडसे यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. मुकेश प्रदीप सिंग, असे आरोपीचे नाव आहे.

घटनास्थळावरील दृश्य

हेही वाचा -Suicide in Karnataka : पंतप्रधानांकडे तक्रार करणाऱ्या हिंदू युवा वाहिनीच्या राष्ट्रीय सचिवचा संशयास्पद मृत्यू

कफ परेड परिसरात वर्ल्ड ट्रेड सेंटर गेट क्रमांक 4 च्या समोर मंगळवारी दुपारी 1.50 वाजता ही भीषण घटना घडली. भरधाव वेगात आलेल्या एका लाल रंगाच्या कारने रस्त्यावरील पादचाऱ्यांना उडवले. धक्कादायक म्हणजे, कारने एकाला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथील वरिष्ठ लिपिक असून प्रसेनजित गौतम धाडसे (वय 36) असे त्यांचे नाव आहे. तर, अन्य दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नितेश कुमार मंडल (वय 43) आणि सुजय कुमार विश्वास (वय 35) अशी जखमींची नावे आहेत. नितेश मंडल हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये एजीएम, तर सुजय विश्वास हे एसबीआय कॅपिटलमध्ये असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट आहेत.

या प्रकरणी कफ परेड पोलिसांकडून तपास सुरू आहे. कार चालक नशेत असल्याने त्याच्याकडून हा अपघात घडल्याची माहिती मिळते. भरधाव कारने तिघांना उडवल्याचे पाहताच या कारपासून वाचण्यासाठी कारच्या पुढे चाललेला टॅक्सीवाला रस्त्याच्या कडेला आपली गाडी नेण्याचा प्रयत्न करीत होता. या प्रयत्नात टॅक्सीवाल्यानेही एकाला उडवले आहे. आसिफ अहमद शेख, असे जखमी व्यक्तीचे नाव असून, त्यांनाही बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची चित्तथरारक दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

हेही वाचा -Mumbai Bank Case : प्रवीण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

ABOUT THE AUTHOR

...view details