मुंबई - मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपताना स्थायी समितीने १२३ प्रस्तावांना मंजुरी न देता ते राखून ठेवले. पालिकेचा कार्यकाळ संपल्यावर आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. यामधील काही प्रस्ताव मंजूर केले असले तरी बहुसंख्य प्रस्तावांना मंजुरी दिलेली नाही. सत्ताधारी सेनेच्या भ्रष्टाचाराला साजेल अशी पुरक कार्यपद्धती अवलंबू नये. प्रस्तावांमध्ये अवैधता आढळत असेल तर आपण संपूर्णपणे त्याला नामंजूर करावे अशी मागणी भाजपाने पालिका आयुक्तांकडे केली आहे. तसे पत्र भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.
पालिका आयुक्तांना पत्र -मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना भाजपाचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी एक पत्र लिहिले आहे. त्यात निवडून आलेल्या नगरसेवकांचा कालावधी (७ मार्च २०२२)रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे महापालिका बरखास्त झाली आहे. महापालिका संपुष्टात आल्याने यापूर्वीच्या स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आले.
नालेसफाई आणि चर बुजवण्याचे काम - यावेळी मात्र, समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांचे कामकाज पहाणारे विमल अगरवाल यांची कंत्राटदारांशी बोलणी फिस्कटल्याने काही प्रस्ताव विचारात घेतलेले नाही, असे एकूण १२३ प्रस्ताव होते. सदरचे प्रस्ताव मंजूर करणे हे आता प्रशासकाच्या अखत्यारित आहेत. तथापि आपण यावर ठोस निर्णय घेताना दिसला नाही. भाजपने नालेसफाईच्या कामांबाबत तीव्र टीका केल्यानंतर आपण २५ दिवसांनी नालेसफाई आणि चर बुजवण्याच्या कामांचे प्रस्ताव समंत केले असे शिंदे यांनी म्हटले आहे.