मुंबई - दहीहंडी गोपाळकाला हा सण अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. यात हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांची चढावर आपल्याला नवी नाही. हंडी फोडण्यासाठी मानवी मनोरा रचला जातो. यासाठी या गोविंदा पथकांची तयारी अनेक दिवस सुरू असते. मात्र, काही वेळा मानवी मनोरा रचताना थर पडल्याने अनेक गोविंदांचा मृत्यू देखील झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे या गोविंदाना विमा संरक्षण देण्याचा मुद्दा वारंवार समोर येत असतो. यावेळी शिंदे फडणवीस सरकार तर्फे प्रत्येक गोविंदा पथकाला दहा लाखाचा विमा जाहीर झाला prasad lad on govinda pathak insurance cover आहे.
भाजपकडून 10 लाखांचा विम्याच्या संदर्भात बोलताना भाजपचे नेते व आमदार प्रसाद लाड म्हणाले की, "आज पासून पुढे 19 तारखेपर्यंत अशी सराव शिबिर सुरू राहतील. 19 तारखेला खऱ्या अर्थाने आपण दहीकाला साजरा करू. मी सर्वांना एकच विनंती करतो, आपण जेव्हा थर लावता तेव्हा आपल्याला स्वतःला आणि आपल्या सहकाऱ्याला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेऊनच थर लावावेत. कारण, आपल्या घरी आपली लोक वाट पाहत आहेत. आमच्या पक्षाच्या मार्फत प्रत्येक मंडळाला दहा लाखाचा विमा जाहीर केला गेला आहे. माझी सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या मंडळांच्या नोंदी करून या विम्याचा लाभ घ्यावा."