मुंबई - आडमुठेपणा ठेवून जर लस घेत नसाल तर मग महामारी कायदा लावून लसीकरण करावे लागेल. तशी वेळ आणू नका असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ( Kishori Pednekar warning over children vaccination ) दिला. गेले काही दिवस लहान मुलांचे लसीकरण सुरू आहे. मात्र, म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेने ठरवेले लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होताना ( BMC Children vaccination target ) दिसत नाही.
मुंबईकरांसाठी मकर संक्रातीच्या दिवशी पालिकेच्यावतीने 89992 28999 या नंबरवर व्हॉटसअप चॅट बॉट सेवा सुरू ( BMC chatbot for vaccination ) करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना व्हॉटसअपवर माहिती उपलब्ध केली जाणार आहे. या सेवेच्या लोकार्पणानंतर महापौर किशोरी पेडणेरकर म्हणाल्या, की डोससाठी मागणी वाढत आहे. त्याप्रमाणे पुरवठा वाढला पाहिजे. दोन डोसमधील कालावधी कमी करायला हवा, अशी अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण वाढविण्यासाठी पालकांनी पुढे यावे, असे आवाहन महापौरांनी केले. अॅलर्जी असणारे काहीजण लस घेत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा-Goa Election : तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारांना तिकीट देतात, मग मला का नाही? - उत्पल पर्रीकर