महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बीकेसी, दहिसर, मुलुंड कोविड सेंटर सुरू होण्यासाठी आता सोमवारचा मुहूर्त?

'तौक्ते' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 15 मे पासून बीकेसी, दहिसर आणि मुलुंड कोविड सेंटर बंद आहे. हे सेंटर 1 जूनला सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. पण हे सेंटर अजून सुरू झालेले नाही. तर आता हे सेंटर सुरू होण्यासाठी सोमवारचा मुहूर्त सांगितला जात आहे.

कोविड सेंटर
कोविड सेंटर

By

Published : Jun 4, 2021, 9:01 PM IST

मुंबई- 'तौक्ते' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 15 मे पासून बीकेसी, दहिसर आणि मुलुंड कोविड सेंटर बंद आहे. हे सेंटर 1 जूनला सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. पण हे सेंटर अजून सुरू झालेले नाही. तर आता हे सेंटर सुरू होण्यासाठी सोमवारचा मुहूर्त सांगितला जात आहे. सोमवारपासून या सेंटरमध्ये रुग्ण दाखल करून घेतले जातील आणि त्यामुळे पालिका रुग्णालयावरील ताण कमी होऊन नॉन कोविड रुग्णांकडे लक्ष देता येईल असे म्हटले जात आहे.

वादळाचा धोका लक्षात घेता रुग्णांना हलवले
बीकेसी, दहिसर आणि मुलुंड कोविड सेंटरमध्ये पाणी सचण्याच्या घटना पावसाळ्यात घडतात. अशावेळी चक्रीवादळात मुसळधार पाऊस आणि वारे सुटण्याची शक्यता असते. तेव्हा 15 मे रोजीच मुंबई पालिकेने या तिन्ही सेंटरमधील रुग्णांना इतरत्र हलवले. त्यानंतर वादळात सेंटरचे काही प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे कोविड सेंटर डागडुजीसाठी 15 दिवस बंद ठेवण्यात आले. तर 1 जूनला कोविड सेंटर सुरू होईल, असे सांगण्यात आले. पण अजूनही ही तिन्ही सेंटर सुरू झालेले नाहीत.

डॉ. राजेश डेरेंकडून माहितीला दुजोरा

सध्या मुंबईत कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. असे असले तरी ही कोविड सेंटर सुरू झाल्यास पालिका रुग्णालयावरचा ताण कमी होणार आहे. त्यामुळे हे सेंटर सुरू होण्याची गरज आहे. त्यानुसार आता सोमवारपासून बंद कोविड सेंटर सुरू होतील असे आता सांगितले जात आहे. तर बीकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी ही याला दुजोरा दिला आहे. सोमवारी बीकेसी कोविड सेंटर सुरू होईल. पालिकेकडून उद्या तसे अंतिम निर्देश आले की परवा आम्ही सेंटर सुरू करण्यास तयार आहोत असेही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा- 'अनलॉक'वरून विरोधकांच्या हातात आयते कोलीत; तर काँग्रेसकडून सारवासारव

ABOUT THE AUTHOR

...view details