महाराष्ट्र

maharashtra

Chandrakant Patil criticizes Rupali Chakankar : रुपालीताई, तुम्ही सुसंस्कृत घराण्यातल्या! वाईन प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचा चाकणकरांना टोला

रुपालीताई सांगतात की वाईनला महिलांचा पाठिंबा आहे. रुपालीताई चाकणकर यांनी हा नवीन शोध लावलेला आहे. रुपालीताई चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी महिलांबद्दल अशा पद्धतीचे बोलणं चुकीचं आहे. असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

By

Published : Feb 10, 2022, 9:36 PM IST

Published : Feb 10, 2022, 9:36 PM IST

Updated : Feb 10, 2022, 10:05 PM IST

Chandrakant Patil criticizes Rupali Chakankar
वाईन वक्तव्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटल यांची महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांवर टीका

मुंबई- राज्याच्या महिला आयोग अध्यक्ष ( State Women's Commission Chairperson ) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांनी वाईन संदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. पाटील म्हणाले, की 'वाईन विक्रीला महिलांचा पाठिंबा आहे', असे विधान रुपाली चाकणकरांनी केले होते.

रुपालीताई चाकणकर यांचा नवीन शोध
भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले, की रूपालीताई सांगतात की वाईनला महिलांचा पाठिंबा आहे. रूपालीताई चाकणकर यांनी हा नवीन शोध लावलेला आहे. रूपालीताई चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी महिलांबद्दल अशा पद्धतीचे बोलणं चुकीचं आहे. विशेष करून वाईनला पाठिंबा दिल्याने शेतकऱ्यांना किती फायदा होईल हा भाग वेगळा आहे. परंतु सुसंस्कृत घरातील असलेल्या रूपालीताई चाकणकर यांनी अशा पद्धतीणे बोलणे, म्हणजे पाठिंबा देण्यासारखं आहे.

हेही वाचा :Rupali Chakankar Criticized Chandrakant Patil : 'चंद्रकात दादा बोलतात कमी बरळता जास्त'

शरद पवारांच्या विधानाची आठवण

राज्य सरकारने सुपर मार्केट व किराणा दुकानांमध्ये वाईन विकण्याचा निर्णय घेतल्यानंतर याबाबत विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. राज्यभरातून याला विरोध होत असताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी सुद्धा वेळप्रसंगी हा निर्णय मागे घ्यायला लागला तरी माझी हरकत असणार नाही, असं विधान केलं होतं. त्या विधानाची आठवण सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी रूपाली चाकणकर यांना करून दिली.

Last Updated : Feb 10, 2022, 10:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details