मुंबई - महापालिकेच्या कामाचे टेंडर मागे घ्या नाही, तर ५० टक्के द्या, अशी धमकी भाजपाच्या मुलुंड येथील नगरसेविका रजनी केणी ( BJP Corporator Rajni Keni ) यांच्या मुलाने दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी नगरसेविकेच्या मुलासह ( Case Filed Against Corporator Son ) अन्य लोकांवर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. याची गंभीर दखल घेत भाजपाकडून नगरसेविका रजनी केणी ( BJP Corporator Rajni Keni ) यांना पक्षातून बडतर्फ का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस ( Show Cause Notice ) बजावण्यात आली आहे. भाजपा मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा ( BJP Mumbai President Mangalprabhat Lodha ) यांनी तसे पत्र नगरसेविका रजनी केणी यांच्याकडून स्पष्टीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- कंत्राटदाराला धमकी
मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड म्हाडा परिसरात राहणारे संकेत हिर्लेकर ( वय ३७ ) यांना पालिकेच्या ऑनलाइन ई-टेंडरव्दारे वॉर्ड क्रमांक १०५ मधील दोन कामे मिळाली. काम मिळाल्यानंतर ४ डिसेंबर रोजी काॅन्ट्रॅक्टर मनोज जाधव यांनी कॉल करून हिर्लेकर यांना टेंडर मागे घेण्यास सांगितले. त्यापाठोपाठ नगरसेविका रजनी केणी यांचा मुलगा नमित केणी याने कॉल करून भेटण्यास बोलावले. त्यानुसार, ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता केणी यांच्या कार्यालयात गेल्यानंतर संकेत हिर्लेकर यांची नगरसेविका रजनी केणी यांची भेट झाली. याचवेळी केणी यांचा मुलगा नमित याने टेंडर मागे घेत असल्याबाबत पत्र तयार करून हिर्लेकर यांना सही करण्यास सांगितले. त्याला हिर्लेकर यांनी नकार देताच, बनावट सही करून जबरदस्ती कारमध्ये बसवून पालिकेच्या मुलुंड येथील टी वाॅर्ड कार्यालयात नेत अर्ज देण्यास भाग पाडले. संकेत हिर्लेकर यांच्याकडून टेंडर मागे घ्या नाही तर ५० टक्के द्या म्हणत, सिव्हिल कंत्राटदाराला भाजपा नगरसेविका रजनी केणी यांच्या कार्यालयात डांबून त्यांच्या मुलाकडून दमदाटी करत धमकावल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. दरम्यान नवघर पोलिसांनी नगरसेविका केणी यांच्या मुलासह अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून मनोज जाधव याला अटक करण्यात आली आहे.
- भाजपाकडून गंभीर दखल