महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'मनसेची विचारधारा वेगळी, सोबत घेतल्यास भाजपचे होईल नुकसान'

भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संभाव्य युतीच्या चर्चा सध्या राज्यात सुरू आहेत. मात्र, भाजपचे मित्रपक्ष याला अनुकुल असल्याचे दिसत नाही. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवलेंनी याबाबत आपली नापसंती दर्शवली.

Ramdas athawale about BJP MNS Alliance
भाजप-मनसे संभाव्य युतीबाबत रामदास आठवलेंचे मत

By

Published : Jan 10, 2020, 5:04 PM IST

मुंबई -मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसापूर्वी एका ठिकाणी गुप्त भेट झाल्याची सध्या चर्चा आहे. या भेटीनंतर भाजप आणि मनसे एकत्र येणार का? यावर सध्या चर्चा सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, मनसेने आपली भूमिका येत्या काळात बदलली तर विचार केला जाऊ शकतो, असे संकेत दिले. यानंतर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांना याबाबत विचारले असता, त्यांनी मात्र भाजपने मनसेला सोबत घेऊ नये, अशी प्रतिक्रिया दिली.

भाजप-मनसे संभाव्य युतीबाबत रामदास आठवलेंचे मत प्रतिकुल....

हेही वाचा... 'बाळासाहेबांच्या स्मारकासाठी झाड तोडणार नाही तर लावणार'

मनसे ही मुंबई आणि महाराष्ट्र पुरता विचार करते. त्यांची विचारांची पद्धत वेगळी आहे. ती भाजपला पटण्यासारखी नाही. मनसेला सोबत घेऊन भाजपमधील अनेकांची मने दुखावली जातील. त्यामुळे भाजपने मनसेला सोबत घेऊ नये. भाजपचेच यामुळे मोठे नुकसान होईल, असे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन: संत गोरा कुंभारांचा देखावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुप्त भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबत युतीचे संकेत दिले. सध्या तरी मनसे आणि भाजपची युती नाही. दोघांच्या विचारांत खुप अंतर आहे. मनसेची कार्यपद्धती बदलली आणि दोन्ही पक्षांची मने जुळली तर युती होऊ शकते, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मनसे आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा... निर्भया प्रकरण: 'जर मला फाशी झाली तर माझं कुटुंब उद्ध्वस्त होईल'

मनसे आणि भाजप जर एकत्र आले तर.. याबाबत मित्रपक्षांनी मात्र सरमिसळ भुमिका घेतल्या आहेत. दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याच्या अगोदरच, त्यांनी मनसे आणि भाजपने एकत्र येऊ नये. त्यामुळे नुकसान होईल, ते जर सोबत आले तर मित्र पक्ष काय करतील ? त्यांची मने दुखावली जातील, असा सुर लावला आहे. त्यामुळे यासर्व पार्श्वभूमीवर भाजप आता काय करणार ? तसेच मनसे आणि भाजप एकत्र येणार का ? हे पाहणे औसुक्याचे ठरेल.

ABOUT THE AUTHOR

...view details