महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BJP polkhol rath yatra : रथ तोडफोड प्रकरणी 4 जणांना अटक, दोषींवर उचित कारवाई करावी - भाजप नेते प्रवीण दरेकर

भाजपच्या पोलखोल यात्रेतील रथावर ( Bjp polkhol rath yatra ) काही अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली होती. या संदर्भामध्ये काल भाजप नेते प्रवीण दरेकर ( Pravin darekar on bjp polkhol rath yatra ) यांच्या नेतृत्वात चेंबूर पोलीस स्थानकात आंदोलन करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन पोलिसांनी आज ४ जणांना अटक केली आहे, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली.

By

Published : Apr 20, 2022, 2:18 PM IST

pravin darekar on polkhol rath yatra
भाजप पोलखोल यात्रा प्रवीण दरेकर प्रतिक्रिया

मुंबई -भाजपच्या पोलखोल यात्रेतील रथावर ( Bjp polkhol rath yatra ) काही अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली होती. या संदर्भामध्ये काल भाजप नेते प्रवीण दरेकर ( Pravin darekar on bjp polkhol rath yatra ) यांच्या नेतृत्वात चेंबूर पोलीस स्थानकात आंदोलन करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन पोलिसांनी आज ४ जणांना अटक केली आहे. त्यामधील एक युवा सेनेचा पदाधिकारी असल्याचे प्रवीण दरेकर ( Pravin darekar news mumbai ) यांनी म्हटले आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

माहिती देताना भाजप नेते प्रवीण दरेकर

हेही वाचा -Phone tapping case : राऊत खडसेंचे फोन समाजकंटक म्हणुन टॅप केल्याचा खुलासा, राऊतांची पुन्हा टीका

आमच्या दबावाने पोलिसांनी घेतली दखल - या संदर्भात बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, चेंबूर पोलीस स्थानकामध्ये आम्ही आंदोलन केले आणि पोलिसांना सांगितले होते की, या हल्ल्यामागे महाविकास आघाडी किंवा शिवसेनेचा हात असल्याचा आम्हाला दाट संशय आहे. तुम्ही ताबडतोब जर रात्रीपर्यंत या ठिकाणी गुन्हा दाखल केला नाही, काही कारवाई झाली नाही, तर पुन्हा आम्ही उद्या मोर्चा आणू, अशा प्रकारचा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ४ आरोपींना ताब्यात घेतलेल आहे. जर पुन्हा आरोपींवर कारवाई करण्यासाठी हलगर्जीपणा केला गेला, सरकारच्या दबावाखाली जर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, तर पुन्हा एकदा त्या ठिकाणी आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले तर आम्ही ते उपसू, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला.

युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याचा समावेश? - तोडफोड प्रकरणी युवा सेनेचा एक पदाधिकारी सीसीटीव्ही फुटेजमध्ये असल्याची माहिती असून, पोलीस तपासामध्ये त्याची खातरजमा होईल, असे दरेकर म्हणाले. त्यानंतर नेमका यामागे कोणाचा हात आहे, हे सुद्धा स्पष्ट होईल, असेही दरेकर म्हणाले.

हेही वाचा -Tody Weather In MH : उन्हाच्या झळा! वाचा आजचे राज्यातील तापमान

ABOUT THE AUTHOR

...view details