महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विमानाने-बोटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर, बेस्टने 'या' मार्गावर सुरू केल्या बसेस

बेस्ट प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उद्यापासून (दि. 1 नोव्हेंबर) बेस्ट उपक्रमाकडून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते ठाणे कॅडबरी जंक्शन पूर्व दरम्यान आणि भाऊचा धक्का ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान वातानुकूलित बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

By

Published : Oct 31, 2021, 6:58 PM IST

बेस्ट बस
बेस्ट बस

मुंबई -बेस्ट प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उद्यापासून (दि. 1 नोव्हेंबर) बेस्ट उपक्रमाकडून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते ठाणे कॅडबरी जंक्शन पूर्व दरम्यान आणि भाऊचा धक्का ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान वातानुकूलित बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या आणि रोरो बोटीने प्रवास करणाऱ्या प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विमानतळ ते कॅडबरी जंक्शन

बेस्टकडून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून मुंबईच्या विविध भागात वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात आली आहे. वातानुकूलित बस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबर, 2021 पासून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून ठाणे कॅडबरी जंक्शन (पूर्व)साठी वातानुकूलित बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विमानतळ ते ठाणे कॅडबरी जंक्शन पूर्व दरम्यान धावणारी बस साकीनाका, मरोळ नाका, पवई उद्यान, जोगेश्वरी लिंक रोड, कांजूर, पूर्व द्रुतगती मार्ग, तीन हात नाका, कॅडबरी जंक्शनवर चालवण्यात येणार असल्याचे उपक्रमाकडून सांगण्यात आले.

सीएसएमटी ते भाऊंचा धक्का

भाऊचा धक्का येथून अलिबाग ते मांडवा दरम्यान समुद्रमार्गे जाण्यासाठी रोरो बोट सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना या रोरो बोटीचा लाभ घेण्यासाठी. सोमावरपासून (दि. 1 नोव्हेंबर) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून भाऊचा धक्का येथे जाण्यासाठी वातानुकूलित इलेक्ट्रीक बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भाऊचा धक्का दरम्यान रेल्वे अपघात न्यायालय, कर्नाक बंदर, प्रिन्सेस गोदी, वाडी बंदर, तपासणी नाका या दरम्यान चालवण्यात येणार असल्याचे उपक्रमाकडून सांगण्यात आले.

सीएसएमटी ते भाऊचा धक्का बस फेऱ्या

सीएसएमटी - सकाळी 6:30 वाजता, रात्री 9:30 वाजता

भाऊचा धक्का - सकाळी 6:50 वाजता, रात्री - 10 वाजता

विमानतळ ते कॅडबरी जंक्शन बस फेऱ्या

विमानतळ - सकाळी 7:30, 8:30, 9:30, संध्याकाळी - 5, 6 व 7 वाजता

कॅडबरी जंक्शन - सकाळी - 6, 7 व 8 वाजता, संध्याकाळी - 3:25, 4:25 व 5:25 वाजता

हे ही वाचा -बुलेट ट्रेन प्रकल्पाला राज्यात गती; बीकेसी ते कल्याण भुयारी मार्गाकरीता निविदा प्रक्रिया सुरू !

ABOUT THE AUTHOR

...view details