मुंबई -भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अहंकारामुळे ( Uddhav Thackerays conciet ) मेट्रो कार शेडचे ( Metro Car shed ) काम रखडले. त्यामुळे आता या प्रकल्पात जवळपास 10 हजार कोटी रुपये किंमत वाढली असल्याचा ठपका किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ठेवला आहे. राज्यात देवेंद्र फडणीस सरकार असताना मेट्रो कार शेडसाठी आरेमध्ये असलेल्या जागेवर कार शेडची निश्चिती झाली होती. मात्र राज्यात सरकार बदलले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आरेमधील कारशेडच्या जागेसाठी कांजूरमार्ग येथील जागा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्या कार्यकाळात उद्धव ठाकरे यांना मेट्रो कार शेडसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देता आली नाही. त्यांच्या अहंकारामुळे जवळपास दहा हजार कोटी रुपये या प्रकल्पासाठी वाढली असल्याचा आरोप किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन केला.
सातत्याने कारशेड कांजूरमार्गला हलविण्यासाठी प्रयत्न -उद्धव ठाकरे सातत्याने कारशेड कांजूरमार्ग हलविण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र ही जागा कारशेडसाठी उपलब्ध होऊ शकत नाही. हे उद्धव ठाकरे यांना देखील माहीत होते. ठाकरे सरकारने नेमलेल्या समितीने देखील कांजूरमार्गची जागा कार शेडसाठी होऊ शकत नाही असा अहवाल दिला होता. या जागेवर कारशेड बनवलास मेट्रो प्रकल्प सुरू करण्यास चार वर्षाचा विलंब होऊ शकतो आणि कोट्यावधी रुपये अधिक लागू शकतात या अहवालात नमूद करण्यात आले होते. मात्र आपल्या स्वार्थापोटी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मध्ये कारशेड होऊ दिलं नाही असा आरोप कीड सोमय्या यांनी केला आहे.