मुंबई :मुंबई विभागातील रिक्षा टॅक्सीचे भाडे दरवाढ करावी, याबाबत सारखी मागणी रिक्षा मालकांकडून होत होती. शासनाने ग्यास दरवाढ केल्याने ही भाडे वाढ आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शासनाने काही प्रमाणात दर वाढ देखील केली. रिक्षा टॅक्सीच्या तुटपुंजी भाडे दरवाढीचा ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनकडून मुंबईत निषेध केला (Auto Rickshaw Taximens Union protests in Mumbai) जातोय. सीएनजी गॅस हा रिक्षा टॅक्सीचालक मालकांना ४०% अनुदानित दराने मिळावा, रुपये २६ प्रति मीटर दर हवा अशी मागणी मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स करत (meager fare hike in Mumbai) आहे. त्या पार्श्वभूमीवर रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडे दरामध्ये शासनाने घोषित केलेली तुटपुंजा दरवाढीचा जाहीर निषेध मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सिमेन्स वतीने केला आहे.
रिक्षा चालकाला 40 टक्के अनुदान मिळावे -कोविड महामारीमुळे रिक्षा आणि टॅक्सीचालकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. त्यांना आपल्या कुटुंबास जगवणे अत्यंत कठीण झाले आहे. लाखो ऑटो रिक्षा-टॅक्सी मालक कर्जबाजारी झालेले आहेत. गेल्या काही कालावधीत सीएनजी गॅसचे दर ६० % हुन अधिक वाढले आहेत, याचा ही मोठा फटका रिक्षा टॅक्सिचालक मालकांना झाला असून त्यांना दैनंदिन प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होत आहे. असे रिक्षा चालकांचे म्हणणे (Auto Rickshaw Taximens Union protests) आहे.