महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aurangabad Rename : औरंगाबादचे लवकरच 'संभाजीनगर' होणार, उद्या कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजुरीला येणार

एकीकडे ठाकरे सरकार आणि शिंदे गटातील सत्तासंघर्ष तीव्र झाला असताना शिवसेनेची मागणी असलेला, वर्षानुवर्षे रखडलेला विषय औरंगाबादचे ( Aurangabad ) नाव बदलण्याचा विषय मार्गस्थ होण्याची शक्यता आहे. लवकरच औरंगाबादचे नाव संभाजीनगर ( Aurangabad may be named Sambhajinagar ) होण्याची शक्यता आहे. उद्या कॅबिनेटमध्ये नामकरणाचा प्रस्ताव ( Naming Proposal In The Cabinet Tomorrow ) मंजुरीसाठी येणार असल्याची माहिती विधानसभेचे संसदीय कार्यमंत्री अनिल परब ( Anil Parab ) यांनी दिली. कॅबिनेटमध्ये राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

aurngabad Renamed
aurngabad Renamed

By

Published : Jun 28, 2022, 8:53 PM IST

मुंबई -गेल्या कित्येक वर्षांपासून औरंगाबाद शहराचे नामकरण करावे, अशी शिवसेनेची मागणी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) शिवसेनेच्या औरंगाबादमधील सभेवेळी नामांतराची घोषणा करतील, अशी बोलले जात होते. आधी विकास, मग नामांतर असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरेंनी प्रस्ताव पुढे ढकलला. आता सरकारवर अस्थिर झाल्यानंतर आज कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव मांडून संभाजीनगर असे नामांतर करण्याची मागणी केली आहे. उद्या हा प्रस्ताव मंजुरीसाठी येईल. त्यावर उद्याच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे परब यांनी सांगितले.

वांद्रे येथील सरकारी घरांचा प्रश्नही तडकाफडकी मार्गी - वांद्रे येथील सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्न कित्येक वर्षापासून प्रलंबित होता. हा प्रस्ताव उद्या कॅबिनेट मीटिंगमध्ये मंजुरीसाठी येईल. या प्रस्तावामुळे घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागून त्यांना दिलासा मिळेल, असे मंत्री परब यांनी सांगितले. कॅबिनेटमध्ये कोणत्याही राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी केवळ चर्चा करायची तयारी दर्शवली आहे. आता निर्णय त्या आमदारांच्या हातात आहे, असेही मंत्री परब म्हणाले.

हेही वाचा -ShahajiBapu Patil : काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल..एकदम ओके..; शहाजीबापूंना पुन्हा शिंदेंनी म्हणायला लावला डायलॉग

ABOUT THE AUTHOR

...view details