महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Dharavi Corona Update : धारावीकरांनी केली कोरोनावर मात, सद्यस्थितीत शून्य सक्रिय रुग्ण

धारावी मॉडेल आणि केलेल्या उपाययोजना, नागरिकांची साथ यामुळे धारावीत अनेकवेळा शून्य रुग्णांची ( Dharavi Zero Patient ) नोंद झाली आहे. धारावीत करण्यात आलेल्या उपाययोजना यामुळे धारावीत आज एकही सक्रिय ( Today Dharavi Patient ) रुग्ण नसल्याने धारावीकरांनी कोरोनावर मात केली आहे.

Dharavi Corona Update
Dharavi Corona Update

By

Published : Mar 24, 2022, 9:07 PM IST

मुंबई -दोन वर्षांपूर्वी मुंबईत कोरोना ( Mumbai Corona ) विषाणूचा प्रसार सुरू झाला असताना सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट ( Dharavi Corona Update ) बनली होती. मात्र, धारावी मॉडेल आणि केलेल्या उपाययोजना, नागरिकांची साथ यामुळे धारावीत अनेकवेळा शून्य रुग्णांची ( Dharavi Zero Patient ) नोंद झाली आहे. धारावीत करण्यात आलेल्या उपाययोजना यामुळे धारावीत आज एकही सक्रिय ( Today Dharavi Patient ) रुग्ण नसल्याने धारावीकरांनी कोरोनावर मात केली आहे.

धारावीत शून्य सक्रिय रुग्ण -मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हॉटस्पॉट ठरली होती. मार्च २०२० मध्ये आलेल्या पहिल्या लाटे दरम्यान सर्वाधिक ९४, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९९ रुग्ण आढळून आले होते. धारावीत गेले काही महिने कोरोनाचे १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. मात्र, मुंबईत डिसेंबरनंतर तिसरी लाट आल्यावर धारावीतील रुग्णसंख्या वाढू लागली. तिसऱ्या लाटेदरम्यान धारावीत ७ जानेवारीला १५० तर ८ जानेवारीला १४७ सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत गेली. आज (२४ मार्च) शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत एकूण ८६५२ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ८२३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या एकही सक्रिय रुग्ण नाही. एप्रिल २०२० मध्ये धारावीत एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता. तब्बल दोन वर्षांनी धारावीत एकही सक्रिय रुग्ण नसल्याची नोंद झाली आहे.

मुंबईत १० लाख ५७ हजार ७१५ रुग्णांची नोंद -मुंबईत आतापर्यंत एकूण १० लाख ५७ हजार ७१५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३७ हजार ८७९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २५८ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २१ हजार ८६५ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००३ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ५४ रुग्णांपैकी ५० म्हणजेच ९३ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २६ हजार ४०२ बेड्स असून त्यापैकी २७ बेडवर म्हणजेच ०.१ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९९.९ टक्के बेड रिक्त आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण ४० वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २२ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा -Prasad Lad In Legislative Council : कॉलेजमध्ये असताना प्रेमप्रकरण करून आमदाराच्या मुलीला पळवून लग्न केले - प्रसाद लाड

ABOUT THE AUTHOR

...view details