मुंबई - आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी विधानसभा अध्यक्षांच्या दिशेने कागदपत्रे भिरकावली. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान निवेदन करण्यास कमी वेळ दिल्याचे सांगत आमदार रवी राणा संतप्त झाले व त्यांनी वेलमध्ये येऊन तालिका अध्यक्ष कुणाल पाटील यांच्या दिशेने कागदपत्रे भिरकावली. (MLA Ravi Rana threw documents at the Assembly Speaker) तालिकाध्यक्षांनी समज दिल्यावर ते जागेवर जाऊन बसले.
मुंबईत विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Assembly Winter Session) सुरू असून दोन्ही सभागृहात विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकी घडत आहेत.