मुंबई:काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अशोक चव्हाण म्हणाले, "एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारला राज्यात शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. (100 days of Maharashtra government). मात्र या शंभर दिवसात नव्या सरकारने केवळ महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिली आहे. ही स्थगिती दिली नसती तर राज्य प्रगतीपथावर गेल असंत. ह्या स्थगित्या उठवल्या गेल्या तरच महाराष्ट्राचे भलं होईल. राज्य सरकारची दृष्टी ही व्यापक असली पाहिजे. मागील सरकार मध्ये जे निर्णय घेतले गेले, ते लोकोपयोगी असतील तर ते अमलात आणणं गरजेचं होतं", असे मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं.
Ashok Chavan: नव्या सरकारने शंभर दिवसात केवळ जुन्या निर्णयांवर स्थगिती दिली - अशोक चव्हाण
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नव्या सरकारने 100 दिवस पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर (100 days of Maharashtra government) त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली.
निवडणूक चिन्हासाठी जनभावना लक्षात घेतली पाहिजे: निवडणूकीच्या चिन्हाबाबत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, शिंदे गट आणि शिवसेना यांच्यामध्ये धनुष्यबाण चिन्हासाठी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. नक्कीच निशाणी बाबतचा निर्णय घेताना आयोग सदस्य संख्या आणि आमदारांचे पाठबळ या बाबींवर जास्त लक्ष देईल, मात्र त्यासोबतच ज्यांनी पक्ष निर्माण केला, ज्यांनी पक्षाची जोपासना केली, याबाबतची जनभावना काय आहे देखील लक्षात घेतलं गेलं पाहिजे. आकडेवारी महत्त्वाची असली तरी जनभावना देखील तेवढीच महत्त्वाची असल्याचं मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं.
भारत जोडो यात्रेची महाराष्ट्रात तयारी:राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पुढील टप्यात महाराष्ट्रातून जाणार आहे. या यात्रेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या आमदारांची आज बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात तसेच काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. भारत जोडो यात्रेबाबतच्या तयारीचा आढावा या बैठकीतून घेण्यात आला. प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघात जाऊन भारत जोडो यात्रेबाबतची माहिती देईल तसेच या यात्रेत जास्तीत जास्त नागरिक सहभागी होतील यासाठी प्रयत्न करेल, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी यावेळी दिली.