महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

RAZA ACADEMY CONTROVERSY फोटो दाखविले तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही- आशिष शेलारांचा नवाब मलिकांना पलटवार

आशिष शेलार हे रझा अकदामीत गेले होते, असेही मलिक म्हणाले होते. त्यावर आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आशिष शेलार म्हणाले, की नवाब मलिक यांना मी मराठीतील ती म्हण पूर्ण सांगणार नाही. पण तुमची खोड काही जात नाही, एवढे मात्र खरे.

By

Published : Nov 15, 2021, 8:01 PM IST

Updated : Nov 15, 2021, 8:16 PM IST

आशिष शेलार

मुंबई -अमरावतीसह इतर जिल्ह्यांमध्ये झालेल्या हिंसाचारावरून राज्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. आम्ही फोटो दाखवले तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा होणार नाही, असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना दिला आहे. भाजप नेते अशिष शेलार हे रझा अकादमीत गेले होते, असा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता.

त्रिपुरामध्ये झालेल्या घटनेचे पडसाद (Reactions of Tripura violence in Mahrashtra) महाराष्ट्रातही उमटले आहेत. एकीकडे त्रिपुरामध्ये अशा पद्धतीची घटना झालीच नाही, असे भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik slammed BJP) यांनी आज पत्रकार परिषद घेतले. या पत्रकार परिषदेत त्यांनीभाजपकडूनहिंसाचाराचे षडयंत्र होत असल्याचा आरोप केला. आशिष शेलार हे रझा अकदामीत गेले होते, असेही मलिक म्हणाले होते. त्यावर आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आशिष शेलारांचा नवाब मलिकांना पलटवार

हेही वाचा-amravati violence : भाजप नेत्यांची धरपकड, डॉ. अनिल बोंडे अटक

दंगलीचा व फोटोचा संबंध काय?

आशिष शेलार म्हणाले, की नवाब मलिक यांना मी मराठीतील ती म्हण पूर्ण सांगणार नाही. पण तुमची खोड काही जात नाही, एवढे मात्र खरे. अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोंच्या जीवावर अफवांचे राजकारण करणे हा तुमचा धंदा आहे. पण त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेल्या हिंसाचाराचा आणि सन २०१६-१७ च्या फोटोचा संबंध काय?

हेही वाचा-तीन-चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंसाचार - शरद पवारांचा भाजपवर निशाणा

फोटोचे राजकारण बंद करा

पुढे भाजप नेते शेलार (BJP leader Ashish Shelar) म्हणाले, की रझा अकादमीच्या फोटोशी (Ashish Shelar Photo in Raza Academy) माझा संबंध काय? ही बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झालेली नाही. जुन्या कुठल्यातरी फोटोचा दाखला देऊन आजच्या दंगलीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या अपयशाला लपवण्याचे काम तुम्ही करू नका. तुमची खोड जात नसेल तर असे असंख्य फोटो रझा अकादमी सोबतचे आम्हाला दाखवावे लागतील. तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. महाराष्ट्र विकास आघाडीने आणि राष्ट्रवादीनेही फोटोचे राजकारण बंद करावे, असा इशारा आशीष शेलार यांनी दिला आहे.

हेही वाचा-ST STRIKE UPDATE कारवाईची नोटीस मागे घ्या, अन्यथा एसटी महामंडळाला टाळे ठोकू - प्रवीण दरेकर

शरद पवारांची भाजपवर टीका-

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले, की त्रिपुरात अनुचित घडले म्हणून महाराष्ट्रात असे घडणे योग्य नाही. राज्यातील काही मोजक्या भागात या घटना घडल्या आहेत. तीन-चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे जाणीवपूर्वक केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP president Sharad Pawar) यांनी भाजपचे नाव न घेता केला आहे. एकेकाळी सत्तेत असलेले काही लोक शांततेला धक्का बसेल असे काम करत आहेत. है दुर्दैव आहे. राज्य सरकार चांगले काम करत असताना हे घडू नये.

Last Updated : Nov 15, 2021, 8:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details