मुंबई- क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानच्या व्हाट्सअप चॅट नंतर अभिनेत्री अनन्या पांडे हीचे नाव समोर आल्यानंतर गेल्या दोन दिवसापासून अनन्या पांडेची चौकशी एनसीबीकडून सुरू आहे. आज यांची जप्त केलेले मोबाईल आणि लॅपटॉप फॉरेन्सिक लॅब तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वी एनसीबी अधिकाऱ्यांकडून अनन्या पांडे यांच्या घरी जाऊन चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी एनसीबी अधिकाऱ्यांकडून अनन्या पांडे चा एक लॅपटॉप आणि दोन मोबाईल जप्त केले होते. ते आज फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अनन्या पांडे आणि आर्यन खान यांचा व्हाट्सअप चॅटिंग ड्रग्जचा उल्लेख असल्यामुळे अनन्या पांडे ची NCB अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर येत्या मंगळवारी हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे सध्या एनसीबी हायकोर्टात आणखी ठोस बाजू मांडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बुधवारी एनसीबीने कोर्टात दाखल केलेल्या आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये एका बॉलिवूडच्या नवोदित अभिनेत्रीचं नाव असल्याचे समोर आलं होतं. त्यानंतर गुरुवारी ही अभिनेत्री कोण आहे, याचा खुलासा झाला. बॉलिवूडमधील नवोदित अभिनेत्री अनन्या पांडे हिच नाव आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये आढळले. यात ड्रग्ज संबंधित बातचित केल्यामुळे अनन्याला एनसीबीने समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहायला सांगितले. काल अनन्याची एनसीबीकडून २ तास चौकशी केल्यानंतर आजही तिची चौकशी सुरु आहे.
बॉलिवूड अभिनेत्रीसोबत आर्यनचा व्हाँट्सअप चॅट