मुंबई -महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या बदलामुळे महाविकास आघाडीला ( Mahavikas Aghadi ) मोठा झटका लागला आहे. अशात आज विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकी ( Assembly Speaker Election ) नंतर बोलताना या उलथा-पालथी मागे नक्की कोणती अदृश्य शक्ती आहे हे प्रत्यक्ष समजू शकले नसले तरी, आज राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ ( NCP leader Chhagan Bhujbal ) यांनी मोबाईलवर आलेला एक मेसेज वाचून दाखवत या परिस्थिती मागील अदृश्य शक्तीवर प्रकाश टाकला आहे.
हेही वाचा -Narvekar assembly speaker राहुल नार्वेकर नवे विधानसभा अध्यक्ष
काय होता मेसेज?भुजबळांनी सभागृहात मेसेज वाचत सांगितले की, मला एक मेसेज आला आहे. त्यात असे लिहिले आहे की, प्रख्यात बुद्धिबळ पट्टू विश्वनाथ आनंद यांना कुणी विचारले की, आता तुम्ही बुद्धिबळ खेळणे बंद का केले आहे? त्यावर विश्वनाथ आनंद म्हणाले की, सध्या अमित शहा ज्या पद्धतीने सोंगट्या टाकत आहेत ते पाहता काहीच समजत नाही असे म्हणत अदृश्य शक्तीबाबत वक्तव्य केले आहे.
नर्वेकर यांचा विजय -शिवसेनेचे बंडखोर नेतेएकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी त्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यपालांनी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलाविले ते आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान ( Maharashtra Assembly Speaker election ) प्रक्रिया पार पडली. यात नर्वेकर यांचा विजय झाला.
बहुमतापेक्षा जास्त मते: महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या राहुल नार्वेकरांची यांची निवड झाली. गदारोळात हे मतदान पार पडले. भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार नार्वेकर यांना 164 मत मिळाले. नार्वेकरांना बहुमतापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करावी असा प्रस्ताव भाजपाकडून मांडला. महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांचा प्रस्ताव मांडला. यात नार्वेकर विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना 107 मते मिळाली. तर तीन आमदारांनी तटस्थतेची भुमिका घेतली.
राजकारणातील अनपेक्षित घडामोडी?शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत सरकार स्थापन केले व मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. या नाट्यमय घडामोडी अजून संपलेल्या नाही आहेत. कधी नव्हे असा चमत्कार राज्याच्या राजकारणात सुरू आहे. ज्यांनी हे सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सगळीकडे रंगली होती. मात्र, तसे झाले नाही. आतापर्यंतचा मागील इतिहास बघता विधानसभा अध्यक्षपदी सभागृहातील ज्येष्ठ, वरिष्ठ सदस्याची विधानसभा अध्यक्ष पदी नेमणूक केली जाते. पण भाजपने आमदार राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. नार्वेकर यांची आमदारकीची पहिलीच टर्म आहे. ते वकील असल्याकारणाने त्यांना अध्यक्ष पद दिले गेले आहे. म्हणून सध्याच्या राजकारणातील या सर्व घडामोडी अनपेक्षितपणे घडत असताना अजून किती धक्के बसणार आहेत हे पाहणे गरजेचे असणार आहे.
हेही वाचा -Speaker Faces Difficulties : नियुक्ती होताच विधानसभा अध्यक्षां पुढे अडचणी