महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Minor Girl Molesting Case : अल्पवयीन मुलीचा विनयंभग करणाऱ्या 70 वर्षीय व्यक्तीला अटक

मुंबईतील आग्रीपाडा परिसरामध्ये 10 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 70 वर्षीय ( 70 Year Old Man Molesting Minor Girl ) आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली ( Man Arrested For Molesting Minor Girl ) आहे.

Minor Girl Molesting Case
Minor Girl Molesting Case

By

Published : May 8, 2022, 6:45 PM IST

मुंबई - मुंबईतील आग्रीपाडा परिसरामध्ये 10 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये कलम 354, पोक्सो अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी एका 70 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात ( 70 Year Old Man Molesting Minor Girl ) आली आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली ( Man Arrested For Molesting Minor Girl ) आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिनाभाई सोलिया (70) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि पीडित मुलगी एकाच परिसरात राहत असून, एकमेकांना ओळखतात. आरोपी मुलीला आपल्या घरी बोलवत असे आणि चॉकलेट आणि बिस्किटांचे आमिष दाखवून मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत. शुक्रवारी मुलीच्या कुटुंबीयांना मुलीमध्ये काही बदल दिसून आल्याने आईने काय झाले, अशी विचारणा केली. तेव्हाच मुलीने संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये येत आरोपीविरोधात कलम 354, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आग्रीपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तात्काळ आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयासोर हजर केले असता, सर्व प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर आरोपीला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास आग्रीपाडा पोलिसांकडून सुरू आहे.

हेही वाचा -Sadabhau Khot : 'मुख्यमंत्र्यांचा बोलवता धनी हा बारामतीला'; सदाभाऊ खोतांची उद्धव ठाकरेंवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details