महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अकरावी विशेष फेरी गुणवत्ता यादीत ५९ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

अकरावीच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर करण्यात आली. यामध्ये अर्ज केलेल्या 68 हजार 178 विद्यार्थ्यांपैकी 59 हजार 322 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे.

11th special round merit list
अकरावी विशेष फेरी गुणवत्ता यादी

By

Published : Dec 28, 2020, 10:14 PM IST

मुंबई -अकरावीच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर करण्यात आली. यामध्ये अर्ज केलेल्या 68 हजार 178 विद्यार्थ्यांपैकी 59 हजार 322 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे. तर सुमारे 8 हजार 856 विद्यार्थी प्रवेशाविना राहिले आहेत. या यादीनंतर मुंबई विभागात किमान 89 हजार 44 जागा रिक्त राहतील असे चित्र दिसत आहे.


अकरावी प्रवेशाची विशेष गुणवत्ता यादीत अर्ज केलेले सुमारे 8 हजार 856विद्यार्थी प्रवेशाविना राहिले आहेत. तर या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तर 89 हजार 44 जागा रिक्त राहतील अन्यथा रिक्त जागा लाखावर पोहचण्याची शक्यता आहे. हे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा विशेष फेरीचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे.
अकरावी ऑनलाइन प्रवेशाची विशेष फेरीची गुणवत्ता यादी सोमवारी संध्याकाळी 5 वाजता जाहीर झाली. या यादीत मुंबई विभागातील कॉलेजांमध्ये सर्व शाखांच्या मिळून एकूण 1 लाख 48 हजार 386 जागा (कोटा वगळून) तिसऱ्या फेरीसाठी उपलब्ध होत्या. यासाठी एकूण 68 हजार 178 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते, यापैकी 59 हजार 322विद्यार्थ्यांना विशेष फेरीत महाविद्यालय निश्चित केले आहे. कअर्ज केलेल्या सुमारे 8 हजार 856 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही. या यादीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण 35 हजार 314 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज अलॉट झाले आहे. तिसऱ्या फेरीनंतर एक लाख 35 हजार 466विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.


विशेष फेरीनंतर यादीचे मुंबईतील शाखानिहाय अलॉट प्रवेश
कला - 4,487
वाणिज्य - 35,423
विज्ञान - 18,819
एमसीव्हीसी - 593
एकूण - 59,322

आतापर्यंत यादीनिहाय झालेले प्रवेश

शाखा एकूण जागा कोटा पहिली यादी दुसरी यादी तिसरी यादी एकूण
कला 37,300 3372 6650 2984 1277 14283
वाणिज्य 173520 24629 25724 16040 8569 74962
विज्ञान 10391 12491 19631 8511 4080 44713
एचएसव्हीसी 5660 273 699 393 143 1508
एकूण 3,20,390 40,765 52,704 27,928 14,0691 35,466

ABOUT THE AUTHOR

...view details