मुंबई -एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यापासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. शिवसेना भवन येथे सातत्याने पदाधिकाऱ्यांच्या जोर बैठका सुरु आहेत. आजही उद्धव ठाकरे यांनी महिला पदाधिकऱ्यांच्या बैठका घेतल्या. यावेळी आदित्य ठाकरे बैठकीला उपस्थित होते. शिंदे सरकारने काढलेल्या व्हीपमधून आदित्य यांना वगळले असता त्यांनी सरकारलाच ठणकावले आहे. कोणाच्याही सहानुभूतीची, खास प्रेमाची गरज नाही, असे ते म्हणाले.
आदित्य ठाकरेयांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, शिवसैनिकांचा आवाज ऐकतोय आणि शिवसैनिकांचे आवाज आम्हाला प्रत्येक ठिकाणी आधी पण येत होते आणि आता पण येत आहेत. प्रत्येक शिवसैनिकांचा आवाज उद्धव साहेबांच्या मागे खंबीरपणे आहे. तसेच गेल्या दोन अडीच वर्षात जे काय चांगली काम झाली आहेत ती लोकांसमोर आहेत. लोक यावर न्यायनिवाडा करतील, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
व्हीपवर स्पष्ट भूमिका - शिंदे गटाच्या व्हीपबाबतही आदित्य ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. मला कोणाच्या खास प्रेमाची मला गरज नाही, आमचा अधिकृत व्हीप आहे. सध्या न्यायप्रविष्ठ प्रकरण असेल पण आमचा व्हीप अधिकृत आणि महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच आजपर्यंत ज्या शिवसैनिकांसोबत जे एकनिष्ठ आमदार राहिलेले आहेत, त्यांच्यासोबत कायम राहू, अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी दिली. काहीजण आक्षेपार्ह विधान करत आहेत, त्यांनी स्वतःचा चेहरा आरशात पहावा, असा सल्ला बंडखोर आमदार संजय गायकवाड यांचे नाव न घेता लगावला.
मध्यावधी निवडणुका -आम्ही कॉन्फिडंट आहोत. मध्यावधी निवडणुका लागल्या तर आम्ही तयार आहोत. लवकरच मध्यावधी निवडणुका महाराष्ट्रात लागतील, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच सगळे विश्लेषण आहे हे लोकांनी स्वतः केलेला आहे. त्यावर आम्ही बोलण्याची गरज नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा -Narvekar Meet Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आणखी मोठी घडामोड? मिलिंद नार्वेकर आणि फडणवीसांची भेट