मुंबई -अर्जुन रामपाल चौकशीसाठी सकाळीच एनसीबी कार्यालयात हजर झाला होता. त्यानंतर आता भारती सिंहदेखील मुंबईतील एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाली आहे.
अर्जुन रामपालची एनसीबीकडून सहा तास चौकशी, भारती सिंहनेही लावली एनसीबी कार्यालयात हजेरी
15:15 December 21
अर्जुन रामपालनंतर आता भारती सिंह मुंबईतील एनसीबी कार्यालयात दाखल
11:54 December 21
अभिनेता अर्जुन रामपाल चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल
मुंबई - अमली पदार्थ प्रकरण आणि बॉलिवूड कनेक्शन सध्या सर्वत्र गाजत आहे. अनेकांची या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. अभिनेता अर्जुन रामपाल आज चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाला आहे. त्यांची आज दुसऱ्यादा चौकशी करण्यात येत आहेत.
अर्जुन रामपालला अमली पदार्थ तस्करीप्रकरणी एनसीबीकडून दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले होते. त्याला 16 डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर व्हायचे होते. मात्र, वैयक्तिक अडचणीमुळे तो चौकशीसाठी हजर होऊ शकला नव्हता. त्यामुळे त्याने चौकशीसाठी हजर होण्यासाठी 21 डिसेंबरची वेळ मागून घेतली होती.
अर्जुन रामपालच्या प्रेयसीची चौकशी -
याआधी 11 नोव्हेंबरला अर्जून रामपाल चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर झाला होता. त्यावेळी अमली पदार्थप्रकरणी अर्जुनची तब्बल सात तास चौकशी करण्यात आली. अर्जुनचा मित्र पॉल बार्टल यालाही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली होती. याच प्रकरणात अर्जुन रामपालचे नाव पुढे आले होते. याचबरोबर अर्जुन रामपालच्या प्रेयसीची एनसीबीकडून दोनदा चौकशी करण्यात आली आहे.
ड्रग्ज प्रकरण -
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित असलेल्या अमली पदार्थ प्रकरणाच्या चौकशी दरम्यान एनसीबीसमोर बॉलिवूडमधील 'ड्रग्ज नेक्सस' समोर आले आहे. एनसीबीने दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, चित्रपट दिग्दर्शक करण जोहर, धर्मा प्रोडक्शनचा एक्झिक्युटिव प्रोड्युसर क्षितिज प्रसाद, असिस्टंट डायरेक्टर अनुभव चोपडा यांची चौकशी केली आहे.
हेही वाचा -ड्रग्ज प्रकरण : चित्रपट दिग्दर्शक करण जोहरला एनसीबीकडून समन्स