मुंबई - घाटकोपर भागामध्ये एका छोट्याशा कारणावरून वहिनीच्या तोंडावर अॅसिड टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शुल्लक वादावरून दिराने आपल्या वहिनीच्या तोंडावर अॅसिड फेकलं आहे. या घटनेत महिलेचा चेहरा जळाला आहे. परशीवाडी परिसरात मुनीर बशीर घासवाला चाळीमध्ये ही बुधवारी घटना घडली असून, प्रबुद्ध कांबळे असे आरोपीचे नाव आहे.
मुंबईत दिराचा भावजयीवर अॅसिड हल्ला
मुंबई - घाटकोपर भागामध्ये एका छोट्याशा कारणावरून वहिनीच्या तोंडावर अॅसिड टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परशीवाडी परिसरात मुनीर बशीर घासवाला चाळीमध्ये ही बुधवारी घटना घडली असून, प्रबुद्ध कांबळे असे आरोपीचे नाव आहे.
ही महिला विधवा आहे. कुटुंब चालवण्यासाठी ती नोकरी शोधत होती. यावेळी तिच्या शेजारी राहणाऱ्या सोनाराने मदत केली. त्याने पिडीत महिलेला दुकानात कामास ठेवले. मात्र हे आरोपीला आवडले नाही या रागातच त्याने वहिनीच्या चेहऱ्यावरती अॅसिड हल्ला केला. घटनास्थळी दुकानाचा मालक सुधांशु प्रामाणिक उपस्थित होता. या हल्ल्यात त्याचाही हात आणि चेहरा भाजला आहे. घटनेनंतर दोघांनाही जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं. दोघांवर तिथं उपचार सुरु असल्याचे घाटकोपर पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी प्रबुद्ध कांबळेला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा -MAHARASHTRA BREAKING : केंद्र सरकारने मन मोठे करून इंधनावरील कर कमी करावा- अजित पवार