महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BMC Election : मुंबईत आघाडीत बिघाडी?; पालिका, बेस्टच्या कार्यक्रमांना काँग्रेसची दांडी

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aghadi Government ) सरकार सत्तेत आहे. मात्र गेले महिनाभर मुंबई पालिका आणि बेस्टच्या ( BMC Election ) लोकार्पण आणि उद्घाटन कार्यक्रमांना काँग्रेस मंत्र्यांची अनुपस्थिती दिसून ( Absence of Congress Leaders in Mahavikas Aghadi Program ) आली आहे.

BMC Election
मुंबईत आघाडीत बिघाडी

By

Published : Apr 27, 2022, 6:52 PM IST

Updated : Apr 27, 2022, 8:01 PM IST

मुंबई -राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aghadi Government ) सरकार सत्तेत आहे. मात्र गेले महिनाभर मुंबई पालिका आणि बेस्टच्या ( BMC Election ) लोकार्पण आणि उद्घाटन कार्यक्रमांना काँग्रेस मंत्र्यांची अनुपस्थिती दिसून ( Absence of Congress Leaders in Mahavikas Aghadi Program ) आली आहे. यामुळे काँग्रेस महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराज आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

रवी राजा यांची प्रतिक्रिया

कार्यक्रमांना काँग्रेसची अनुपस्थिती -राज्यात गेले दोन वर्षांहून अधिक काळ महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. सरकारविरोधात काही आरोप, टीका झाल्यावर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीनही पक्ष आम्ही एकत्र असल्याचे सांगत आहेत. मात्र मुंबई महापालिकेच्या तसेच बेस्ट उपक्रमाच्या कार्यक्रमात मात्र विरुद्ध चित्र दिसत आहे. गिरगाव चौपाटी येथील व्हीविंग गॅलरी लोकार्पण, कूपर हॉस्पिटलमधील वैद्यकीय महाविद्यालय इमारत लोकार्पण, बेस्टचे कॉमन मोबिलिटी कार्ड आदी कार्यक्रमांना काँग्रेसची अनुपस्थिती दिसून आली आहे. या कार्यक्रमांना मंत्री बाळासाहेब थोरात ब अस्लम शेख यांना निमंत्रण असूनही ते अनुपस्थित होते.

मंत्री कामात व्यस्त -मुंबई महापालिका आणि बेस्टचे विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमाचे लोकार्पण उद्घाटन महाविकास आघाडीमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत केले जात आहे. या कार्यक्रमाना काँग्रेसच्या मंत्र्यांना निमंत्रण दिले जात आहे. काही कार्यक्रमांना मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख उपस्थित राहिले आहेत. बेस्टच्या कार्यक्रमांना बाळासाहेब थोरात यांना निमंत्रण होते. मात्र काँग्रेसचे मंत्री कामात व्यस्त असल्याने कार्यक्रमांना उपस्थित राहू शकलेले नाही.

काँग्रेस नगरसेवकांमध्ये नाराजी -बेस्टच्या कॉमन मोबिलिटी कार्डसह काही प्रस्तावाला भाजपाचा विरोध होता. ते प्रस्ताव मंजूर करायला सत्ताधारी शिवसेनेला आमच्या मतांची गरज लागली होती. आम्ही महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेला मदत केली होती. याची आठवण ठेवून तरी बेस्टने काँग्रेसच्या माजी लोकप्रतिनिधी, माजी विरोधी पक्ष नेते यांना कार्यक्रमाला बोलवायला पाहिजे. मात्र असे होत नसल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. यापुढे तरी पालिकेच्या आणि बेस्टच्या कार्यक्रमाला माजी विरोधी पक्ष नेते, माजी नगरसेवकांना पालिका बोलवेल अशी अपेक्षा रवी राजा यांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेसच्या स्वबळामुळे दांडी? -मुंबई महापालिकेच्या निवडणुका मार्चमध्ये होणार होत्या. मात्र कोरोना प्रसारामुळे त्या वेळेवर घेणे शक्य झालेले नाही. पालिका निवडणुका शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहे. तर काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे पालिका आणि बेस्टच्या कार्यक्रमांना काँग्रेसचे मंत्री दांडी मारतात का? अशी चर्चा आहे.

हेही वाचा -Kirit Somaiya Meet Governor : किरीट सोमैया यांनी घेतली राज्यपालांची भेट; मुंबई पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची केली मागणी

Last Updated : Apr 27, 2022, 8:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details