महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Megablock On Central Railway : रविवारी मध्य रेल्वेवर बारा तासांचा मेगाब्लॉक; प्रवाशांची होणार गैरसोय!

मध्य रेल्वे महामार्गावर बारा तासांचा मेगाब्लॉक रविवारी सकाळी घेण्यात ( Central Railway Megablock ) येणार आहे. रेल्वेचे स्विच पॉइंट, क्रॉस ओव्हर पॉइंट जोडण्यासाठी आणि दिवा आणि कल्याण स्थानकांदरम्यानच्या ( Diva and Kalyan Station ) कामासाठी दिवा ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत असल्यामुळे हा मेगाब्लॉक ( Central Railway Megablock On Sunday ) घेण्यात आला आहे.

Megablock
मेगाब्लॉक

By

Published : Apr 9, 2022, 2:11 PM IST

Updated : Apr 9, 2022, 3:32 PM IST

मुंबई:मध्य रेल्वेने (Central Railway) दिलेल्या माहितीनुसार या कालावधीत ठाणे येथून सकाळी ८.३७ ते ११.४० आणि दुपारी ४.४१ ते रात्री ८.५९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या, अर्ध , जलद लोकल दिवा आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल सेवा कोपर आणि ठाकुर्ली स्थानकावर थांबणार नाहीत. मुलुंड येथून सकाळी ११.५४ ते सायंकाळी ४.१३ या वेळेत सुटणाऱ्या डाउन धीम्या, अर्ध जलद लोकल मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील या लोकल सेवा कोपर आणि ठाकुर्ली स्थानकात थांबणार नाहीत आणि निर्धारित वेळेच्या १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.


'या' स्थानकांत लोकल थांबणार नाहीत- ठाणे येथून सकाळी ९.०६ ते रात्री ८.३१ या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद लोकल त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा येथे थांबतील आणि निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिरा पोहोचतील. कल्याण येथून सकाळी ८.५१ ते ११.१५ आणि सायंकाळी ६.५१ ते ८.५५ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या लोकल कल्याण आणि दिवा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांत थांबणार नाहीत.याशिवाय कल्याण येथून सकाळी ११.२५ ते दुपारी ३.५१ पर्यंत अप धीम्या/अर्ध जलद लोकल कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल सेवा ठाकुर्ली आणि कोपर स्थानकात थांबणार नाहीत आणि त्या पुढे निर्धारित ठिकाणी वेळेच्या १० -१५ मिनिटे उशिरा पोहोचतील.


सहकार्य करण्याचे आवाहन -कल्याण येथून सकाळी ८.४६ ते रात्री ८.३५ या वेळेत सुटणाऱ्या अप जलद लोकल त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा येथे थांबतील आणि निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिराने पोहोचतील. या विशेष मेगाब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी हे विशेष ब्लॉक आवश्यक आहेत असेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : Booster Dose in Mumbai : : ९२ लाख मुंबईकरांना बूस्टर डोस देण्यासाठी पालिकेचे नियोजन

Last Updated : Apr 9, 2022, 3:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details