मुंबई -दिवा स्टेशनवर 70 वर्षीय एम. जगन्नाथ यादव हे वृद्ध आजोबा आपल्या पोटासाठी वणवण फिरत असल्याचे दिसून आले. ते दिवा स्टेशनवर इग्लिश पेपर वाचत बसले होते. त्यांची इग्रजी वाचणाची स्पीड तरूणाला लाजवेल अशी आहे. एम. जगन्नाथ यादव यांनी मदुराईच्या एसबीएन या महाविद्यालयातून डिग्रीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. (grandfather reads fast English at the Diva station) तसेच, काही बेसिक कंप्यूटर कोर्स ही त्यांनी केले आहेत. (reads fast English at the Diva station) मात्र, नोकरी करण्याच्या उद्देशाने जवळपास तीस वर्षे आधी त्यांनी महाराष्ट्र गाठले.
मुलाचे लग्न झाल्यानंतर त्यांनी आपला वेगळा संसार थाटला
महाराष्ट्रातल्या वर्धा या ठिकाणी त्यांनी एका खाजगी कंपनीत सिक्युरिटी इन्चार्ज ऑफिसर म्हणून काम केल आहे. मात्र, तिथे एक ते दीड वर्ष काम केल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. त्यानंतर मुंबईत असेच मुंबईजवळच्या असलेल्या अनेक ठिकाणी खासगी कंपनीत सिक्युरिटी ऑफिसर म्हणून त्यांनी काम केल आहे. एम जगन्नाथ यादव यांची पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असे कुटुंब आहे. सध्या ते दिवा या परिसरात राहतात. त्यांच्या मुलगा आणि मुलीचे लग्न झाले असून मुलाचे लग्न झाल्यानंतर त्यांनी आपला वेगळा संसार थाटला आहे. त्यामुळे आता मुलगा आपल्याकडे लक्ष देत नाही असे त्यांचे म्हणणे आहे.