महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mulund robbery case : मुलुंडमध्ये भरदिवसा पडलेल्या सशस्त्र दरोड्याचा ४८ तासांत पोलिसांकडून उलगडा, 8 आरोपींना अटक

मुलुंडमधील व्ही.पी. एंटरप्रायझेस या ऑफिसमध्ये 2 फेब्रुवारी रोजी शस्त्रासह दरोडा पडला ( 8 arrested in VP Enterprise office Mulund robbery ) होता. ऑफिसमधील लोकांना दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून 70 लाख लुटले होते. या प्रकरणातील आरोपी फरार झाले होते. मात्र, पोलिसांनी गतीने तपास केल्यानंतर मोठे घबाड हाती लागले. पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले. आठ आरोपींना इतर राज्यातून अटक करण्यात आली आहे.

VP Enterprise office Mulund robbery case
दरोडा मुलुंड व्ही पी एंटरप्रायझेस

By

Published : Feb 7, 2022, 3:15 PM IST

Updated : Feb 7, 2022, 4:00 PM IST

मुंबई -मुलुंडमधील व्ही.पी. एंटरप्रायझेस या ऑफिसमध्ये 2 फेब्रुवारी रोजी शस्त्रासह दरोडा पडला ( 8 arrested in VP Enterprise office Mulund robbery ) होता. ऑफिसमधील लोकांना दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून 70 लाख लुटले होते. या प्रकरणातील आरोपी फरार झाले होते. मात्र, पोलिसांनी गतीने तपास केल्यानंतर मोठे घबाड हाती लागले. पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले. आठ आरोपींना इतर राज्यातून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था विश्वास नागरे पाटील ( Additional Commissioner of Police Vishwas Nangre Patil ) यांनी दिली.

हेही वाचा -Shah Rukh Khan : शाहरुखने लता दीदींच्या पार्थिवासमोर मागितली दुआ, तर्कवितर्कांना उधाण

एकूण लुटलेल्या रकमेपैकी 37 लाख रुपये हस्तगत

मुंबई पोलिसांनी 48 तासांत ही कारवाई केली. एकूण लुटलेल्या रकमेपैकी 37 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. यासोबतच 4 पिस्तूल आणि 2 देशी बनावटीचे पिस्तूल ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच, 27 जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली. उर्वरित रक्कमेचा शोध पोलीस घेत आहेत.

यामुळे तपास जिकीरीचा झाला

दरोडा पडल्याची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे दरोडेखोर यांचा येण्याचा मार्ग व जाण्याचा मार्ग याबाबत माहिती मिळवली. ते सर्वजण पाढऱ्या रंगाच्या एका मारुती ईको क्रमांक एमएच ४६, बीक्यू ०२६८ मधून घटनास्थळी आल्याचे व त्याच व्हॅनमधून पळून गेल्याबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. परंतु, दरोडेखोर यांनी गुन्हेगारी शक्कल वापरून इको व्हॅनच्या नंबर प्लेटस वेळोवेळी बदलल्याने तसेच, अंगावरील कपडे बदलून वेशांतर केल्याने ईको गाडीची व दरोडेखोरांची ओळख पटविणे पोलिसांच्या तपासाच्या दृष्टीने जिकीरीचे झाले होते.

तपासाकरिता पोलीस उपायुक्त, परिमंडळ ७ यांच्या नेतृत्वात परिमंडळ ७ व ६ मधील गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व अंमलदार यांची एकूण १२ पथके तयार करण्यात आली होती. त्यामुळे, पथकांना मुंबई, नवी मुंबई, नाशिक, सातारा, रायगड, ठाणे या जिल्ह्यांत तसेच, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांत रवाना करण्यात आले होते.

तपासादरम्यान पांढरी ईको गाडी चालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेवून तपास केला असता, आरोपीने कबूल केले की, इतर साथीदारांच्या मदतीने त्याने इको गाडीसह मुलुंड येथे येवून एका ऑफिसवर दरोडा टाकून रक्कम चोरली. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास करत या प्रकरणातील इतर आरोपींना देखील अटक केली. आरोपींकडून माहिती मिळाल्यानंतर त्या त्या राज्यातील पोलिसांच्या मदतीने आरोपींना अटक करण्यात आली.

या प्रकरणातील अटक दोन्ही आरोपी यांनी दिलेल्या माहितीवरून, या गुन्ह्यात सहभागी असलेले इतर आरोपी यांना नवी मुंबई, उज्जैन, मध्य प्रदेश, सुरत, गुजरात व वाराणसी, उत्तरप्रदेश येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेवून अटक करण्यात आली. अटक आरोपी यांनी दिलेल्या माहितीवरून या गुन्ह्याच्या घटनास्थळाची रेकी करून माहिती पुरवाणारा डोंबिवली येथील आरोपीलासुद्धा अटक करण्यात आली. तसेच, सदर सर्व गुन्हेगार हे जौनपूर उत्तरप्रदेश येथील गँगस्टरच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारी कृत्य करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

हेही वाचा -PM Talks To Aditya : पंतप्रधानांचा विमानतळावर आदित्यशी संवाद

Last Updated : Feb 7, 2022, 4:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details