मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि मुंबई पोलिसांच्या विरोधात इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकसारख्या माध्यमांतून अपप्रचार केला जात होता. विशेष म्हणजे, बनावट अकाऊंटच्या माध्यमातून पोलिसांवर अर्वाच्य भाषेत शिविगाळही केली जात होता. यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने दोन गुन्हे दाखल केले आहेत.
बनावट अकाऊंटच्या माध्यामातून मुंबई पोलिसांची केली जात होती बदनामी, मास्टरमाईंडना होणार लवकर अटक
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शंका व्यक्त करत हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात आधार घेतला गेला. कित्येक बनावट सोशल मीडिया अकाऊंट्सचा वापर करुन मुंबई पोलिसांविरोधात अपप्रचार करणाऱ्या पोस्ट टाकण्यात आणि शेअर करण्यात आल्या.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शंका व्यक्त करत हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते. त्यानंतर एम्सने सीबीआयकडे जमा केलेल्या अहवालामध्ये सुशांतने आत्महत्याच केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एका अर्थाने मुंबई पोलिसांचा तपास योग्यच होता, असे निष्पन्न झाले. दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात आधार घेतला गेला. कित्येक बनावट सोशल मीडिया अकाऊंट्सचा वापर करुन मुंबई पोलिसांविरोधात अपप्रचार करणाऱ्या पोस्ट टाकण्यात आणि शेअर करण्यात आल्या. यासंदर्भातच सायबर सेलने गुन्हे दाखल केले असून, लवकरच या आरोपींना अटक केली जाणार असल्याचे सायबर पोलीस विभागाच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी स्पष्ट केले आहे.