मुंबई -मध्य रेल्वेचा हार्बर मार्गावरील उद्यापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि गोरेगाव/ वाशी/ पनवेल आणि वांद्रे स्थानका दरम्यान १२ ऐवजी १६ वातानुकूलित लोकल सेवा (AC Train) नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहेत. तर काही वातानुकुलित सेवा सुट्टीच्या दिवशी अर्थात रविवारविना वातानुकुलित (सामान्य) उपनगरीय सेवा म्हणून चालवल्या जाणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
- उद्यापासून १६ एसी लोकल सेवा धावणार -
सर्वप्रथम मध्य रेल्वेने ३० जानेवारी २०२० पासून ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान पहिली एसी लोकल सुरू केली होती. त्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १७ डिसेंबर २०२० पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मार्गावर दुसरी एसी लोकल चालविण्यात आली आहे. मध्य रेल्वेने लोकल सेवेतील काही फेऱ्या बाद करून त्याऐवजी एसी लोकल ट्रेनच्या चालविण्यात येत आहेत . मात्र, एसी लोकलचे भरमसाट तिकिट मुंबईकरांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यातच सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द केल्याने ईतर गाड्यांना प्रवाशांची गर्दी प्रमाण वाढले होते. विशेष म्हणजे ट्रान्सहार्बर मार्गावर धावणाऱ्या १६ एसी लोकलला प्रवाशांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत असल्याने मध्य रेल्वेने या एसीही लोकलही मार्ग बदलविण्याचा निर्णय घेतला होता. ३ जानेवारी २०२२ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि गोरेगाव/ वाशी/ पनवेल आणि वांद्रे स्थानकाचा दरम्यान १२ वातानुकूलित लोकल सेवा सुरु केल्या होत्या. मात्र, आता यात आणखी चार एसी लोकल वाढविण्यात आलेल्या आहे. त्यामुळे उद्यापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि गोरेगाव/ वाशी/ पनवेल आणि वांद्रे स्थानकाचा दरम्यान १२ ऐवजी १६ वातानुकूलित लोकल सेवा धावणार आहे.
वाशीवरून सुटणार पहाटे 05.27 वाजता, सीएसएमटीला पोहचणार सकाळी 06.16 वाजता
सीएसएमटीवरून सुटणार सकाळी 06.24 वाजता, पनवेलला पोहचणार सकाळी 07.44 वाजता
पनवेलवरून सुटणार सकाळी 07.55 वाजता, वडाळाला रोड पोहचणार सकाळी 08.56 वाजता
वडाळा रोडवरून सुटणार 09.08 वाजता, पनवेलला पोहचणार 10.10 वाजता
पनवेलवरून सुटणार सकाळी 10.17 वाजता, सीएसएमटीला पोहचणार सकाळी 11.36 वाजता
सीएसएमटीवरून सुटणार सकाळी 11.40 वाजता, पनवेलला पोहचणार दुपारी 1.01 वाजता
पनवेलवरून सुटणार दुपारी 1.09 वाजता, सीएसएमटीला पोहचणार दुपारी 2 .28 वाजता
सीएसएमटीवरून सुटणार दुपारी 2.34 वाजता, पनवेलला पोहचणार सुपारी 3 .54 वाजतापनवेल सुटणारी दुपारी 4 .01 वाजता, सीएसएमटीला पोहचणार सायंकाळी 5.20 वाजता सीएसएमटीवरून सुटणार सायंकाळी 5 .26 वाजता, वाशीला पोहचणार सायंकाळी 6 .16 वाजता वाशीवरून सुटणार सायंकाळी 6.26 वाजता, सीएसएमटीला पोहचणार 7 .17 वाजता सीएसएमटीवरून सुटणार रात्री 7.24 वाजता, बांद्राला पोहचणार रात्री 7.54 वाजता बांद्रावरून सुटणार रात्री 8.02 वाजता, सीएसएमटीला पोहचणार रात्री 8.32 वाजतासीएसएमटीवरून सुटणार रात्री 8.36 वाजता, गोरेगांवला पोहचणार रात्री 9.32 वाजता गोरेगांववरून सुटणार रात्री 9 .43 वाजता, सीएसएमटी पोहचणार रात्री10.38 वाजता सीएसएमटीवरून रात्री10.45 वाजता, वाशीला पोहचणार रात्री11.34 वाजता.