महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rajesh Kshirsagar On Udhav Thackery: दर 10 ते15 वर्षांनी शिवसेनेत फूट का पडते?, उद्धव ठाकरे यांनी विचार करावा - राजेश क्षीरसागर

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेत आनेक विषयांवर भाष्य केले. एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊन त्यांना पाठिंबा दिला ही कोणतीही बंडखोरी नाही ( We support Eknath Shinde No Rebellion ). आम्हाला कायद्याने दिलेला हा हक्क आहे असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले. तसेच दर दहा ते पंधरा वर्षांनी शिवसेनेत फूट पडायचा ( Shiv Sena splits in every ten years ) प्रसंग का निर्माण होतो असा सवाल ही राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

By

Published : Jul 8, 2022, 10:32 AM IST

Updated : Jul 8, 2022, 12:31 PM IST

उद्धव ठाकरे यांनी विचार करावा
Rajesh Kshirsagar On Udhav Thackery

कोल्हापूर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्या गटाला जाऊन मिळालेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर ( Executive Chairman State Planning Board Rajesh Kshirsagar ) हे आज कोल्हापुरात परतले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे गटात का गेले याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, आम्ही जेव्हा गुवाहाटीला गेलो तेव्हा प्रथमदर्शनी आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र विश्वास दर्शक ठराव जेव्हा पास झाला तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडून जे काही भाषण झाले त्यानंतर सर्व शिवसैनिकांच्या मनातील गैरसमज हा दूर झाला असे ते म्हणाले आहे.

उद्धव ठाकरे यांनी विचार करावा - राजेश क्षीरसागर

दर 10 ते 15 वर्षांनी शिवसेनेत फूट का पडते? -मी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊन त्यांना पाठिंबा दिला ही कोणतीही बंडखोरी नाही ( We support Eknath Shinde No Rebellion ). आम्हाला कायद्याने दिलेला हा हक्क आहे असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले. तसेच दर दहा ते पंधरा वर्षांनी शिवसेनेत फूट पडायचा ( Shiv Sena splits in every ten years ) प्रसंग का निर्माण होतो असा सवाल ही राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

माविआत मित्र पक्षांविरोधातील असंतोष - मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या गटात सामील होवून त्यांना पाठींबा दिला. ही आम्हा शिवसैनिकांची बंडखोरी नसून, शिवसेना संपवायला निघालेल्या महाविकास आघाडीतील मित्र पक्षांविरोधातील असंतोष आणि उठाव आहे.दर दहा ते पंधरा वर्षांनी शिवसेनेत अशी परिस्थिती का निर्माण होते याचा पक्षप्रमुखांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. शिवसेना पक्षवाढीसाठी जीवाचे रान केलेले शिवसैनिक उठावाची भूमिका का घेतात? याचा पक्षनेतृत्वाने कुटुंबप्रमुख म्हणून विचार करणे गरजेचे आहे असे ही राजेश क्षीरसागर यांनी म्हंटले आहे.

चंद्रकांत दादा पाटील हे आमचे नेते - कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकी दरम्यान महाविकास आघाडीत उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारादरम्यान तसेच अनेक बैठकीत राजेश क्षीरसागर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 2019 च्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनीच माझ्या पाठीत खंजीर खुपसले यामुळे माझा पराभव झाला असा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला होता. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळताच राजेश क्षीरसागर यांचा चंद्रकांत पाटील यांच्या बद्दलचा राग कमी झाला आहे असे दिसत आहे. कारण याबाबत त्यांना विचारले असता चंद्रकांत पाटील हे आमचे नेते आहेत आणि राजकारणात कोण कोणाचा मित्र नसतो आणि कोण कोणाचा शत्रूही नसतो, आमच्यात काही मतभेद होते मात्र ते आता चर्चेनंतर सुटले असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे. तसेच चंद्रकांत दादांना कोल्हापूर सोडून जाऊ देणार नाही असेही ते म्हणाले आहेत.

आमचा देव मंदिरातच योग्य होता- २०१९ च्या पराभवानंतरही पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी माझ्याकडे असलेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष पद कायम ठेवले म्हणत त्यांचे आभार ही क्षीरसागर यांनी मानले. तसेच आदित्य ठाकरे यांनी देखील पर्यटन विभागाच्या माध्यमातून शहराच्या पर्यटन वाढीसाठी निधी दिला. मात्र "आमचा देव मंदिरातच योग्य होता" शिवसैनिकांसाठी मातोश्री हे मंदिर असून, महाराष्ट्राच्या राजकारणात रिमोट कंट्रोलची भूमिका "मातोश्री" ने बजावली आहे. त्याच पद्धतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री वरून रिमोट कंट्रोलर ची भूमिका बजावली असती तर आज ही परिस्थिती उद्भवलीच नसती. असे ही क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

आम्ही एकनाथ शिंदे यांना गुरू मानल - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनसेवेचे काम पाहून आपण त्यांना गुरु मानल आहे. त्यांच्या माध्यमातून होणारी आरोग्य सेवेची कामे, विकासाची कामे, मुंबई नंतर ठाणे जिल्ह्याचा झालेला विकास आदींचा विचार करता त्यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्याचे ध्येय शिवसेनाप्रमुखांचे खरे हिंदुत्ववादी विचारांची जपणूक उराशी बाळगूनच मी एकनाथजी शिंदे यांच्या गटात सामील झालो आहे असे राजेश क्षीरसागर म्हणाले आहेत.

हेही वाचा -Rainfall Management In Satara : आपत्ती काळात नागरिकांच्या सहकार्याने मदतकार्य करण्याचे सातारा पालक सचिवांचे निर्देश

Last Updated : Jul 8, 2022, 12:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details