महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 30, 2021, 8:11 PM IST

ETV Bharat / city

कोल्हापुरात १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे एक मे पासून प्रायोगिक तत्वावर लसीकरण

कोल्हापूर जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना प्रायोगिक तत्वावर उद्यापासून लसीकरणास सुरुवात होणार आहे. १ मे पासून जिल्ह्यातील ५ केंद्रावर ही लस देण्यात येणार आहे

Vaccination
Vaccination

कोल्हापूर -१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना प्रायोगिक तत्वावर उद्यापासून लसीकरणास सुरुवात होणार आहे. १ मे पासून जिल्ह्यातील ५ केंद्रावर ही लस देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे


कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांतर्गत महत्वकांक्षी कोविड लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यामध्ये हेल्थकेअर वर्कर व फ्रंटलाईन वर्कर यांचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्यामध्ये ४५ वर्षावरील सर्व नागरिकांचा लसीकरणासाठी समावेश करण्यात आला आहे. कोविड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे शासनाने घोषित केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक १ मे २०२१ रोजी प्रायोगिक तत्वावर ग्रामीण रुग्णालय शिरोळ, वसाहत रुग्णालय गांधीनगर, ग्रामीण रुग्णालय कागल, प्राथमिक आरोग्यकेंद्र भेडसगाव( ता. शाहुवाडी), भगवान महावीर दवाखना, विक्रमनगर कोल्हापूर या पाच शासकीय संस्थेच्या ठिकाणी १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करुन शुभारंभ होणार आहे.

लसीकरण केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी येताना केंद्र शासनाच्या cowin portal वर ऑनलाईन नोंदणी करुन ऑनाईन भेट निश्चीत (तारीख व वेळ ) झाल्यावर निवडलेल्या लसीकरण केंद्रावर वेळेत उपस्थित राहणेचे आहे. येताना सोबत आधार कार्ड व फोटो आयडी असलेले कोणतेही ओळखपत्र घेवून यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. ऑनलाईन नोंदणी आणि ऑनलाईन भेट निश्चित नसलेस नागरिकांना लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. अशी सूचना यापूर्वी देण्यात आली आहे.

ऑनलाईन नोंदणी करताना नागरिकांनी १८ ते ४४ हा वयोगटांची निवड करुन नोंदणी करणेची आहे. सदरची ऑनलाईन नोंदणी मर्यादित स्वरुपाची २०० लाभार्थी प्रति दिवस आहे. ही प्रायोगित तत्वावरील लसीकरण केंद्र पुढील सात दिवस दि. ७ मे पर्यंत वरील पाच ठिकाणीच सुरु राहणार आहे. आशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details