कोल्हापूर - भाजपा नेत्या चित्रा वाघ ( Stone Pelting At Chitra Wagh Rally ) हे गेल्या 2 दिवसांपासून सत्यजीत कदम ( Satyajit Kadam ) यांच्या प्रचारासाठी कोल्हापूरात दाखल झाले आहेत. रोज निरनिराळ्या ठिकाणी त्यांच्या प्रचार सभा सुरू आहेत. मात्र, काल रविवारी सैनिक वसाहतीतील सभेत विरोधी पक्षाकडून दगडफेक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच पालकमंत्री सतेज पाटील ( Satej Patil ) यांच्यावर ही निशाणा साधला आहे. मात्र, ही दगडफेक भाजपनेच केलेली असून हा स्टेज फिक्सिंगचा प्रकार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले होते. या सर्वावर महविकास आघाडीच्या महिला ( Mahavikas Aghadi ) कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना भेटून सखोल चौकशी आणि तपास करण्याचे निवेदन त्यांना दिले होते. तर त्यात त्यांनी ही दगडफेक भाजपच्या समीर शेट ( Samir Shete ) यांनी घडवून आणल्याचा संशय असल्याचे म्हटले आहे. यामुळे त्यांचे कॉल रेकॉर्ड आणि व्हॉट्सॲप संभाषण तपासावे, असे पोलिसांना सांगितले आहे.
भाजपच्या समीर शेठ यांनी घडवून आणल्याचा संशय- मुक्त सैनिक वसाहत येथे भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या सभेत झालेल्या दगडफेकीचा त्यांनी निषेध नोंदवत गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला. मात्र, महविकास आघाडी सरकारच्या महिला कार्यकर्त्यांनी आज पोलीस अधीक्षकांना पत्र देत ही दगडफेक भाजपनेच घडवून आणल्याचे आरोप केले आहेत. ही दगडफेक समीर शेठ यांनी घडवून आणल्याच्या संशय व्यक्त केला असून याबाबत त्यांची चौकशी करावी आणि त्यांचे कॉल रेकॉर्ड आणि व्हॉट्सॲप संभाषण तपासून पाहावे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच सभा झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे, असे निवेदनातून म्हटले आहे.