महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मनाई असतानाही व्हीआयपी दर्शन सुरूच; मंत्री अनिल परबांनी घेतले कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन

यंदाच्या नवरात्र उत्सवात कोणालाही व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी दर्शन दिले जाणार नाही अशी भूमिका पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी घेतले होते. मात्र याच भूमिकेला हरताळ फासण्याचे काम शुक्रवारी पाहायला मिळाले. मंत्री अनिल परब यांनी थेट दर्शन घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल अंबाबाई मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांची प्रचंड नाराजी आहे. तसेच व्हीआयपी दर्शन देत असल्याचे समजल्यानंतर भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

By

Published : Oct 8, 2021, 1:25 PM IST

Updated : Oct 8, 2021, 2:12 PM IST

मंत्री अनिल परबांनी घेतले कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन
मंत्री अनिल परबांनी घेतले कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन

कोल्हापूर- व्हीआयपी, व्ही-व्हीआयपी दर्शन देणार नाही, अशी भूमिका जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी घेतली होती. मात्र करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात व्हीआयपी आणि व्ही-व्हीआयपी दर्शनाचे सत्र सुरूच आहे. आज सकाळी परिवहन मंत्री अनिल परब यांना व्हीव्हीआयपी दर्शन घेऊन पुन्हा एकदा सर्वसामान्यांना वेगळा नियम आणि लोकप्रतिनिधींना वेगळा नियम लागू करण्याची भूमिका घेतल्याचा प्रकार दिसून आला आहे. त्यामुळे भाविकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मंत्री अनिल परबांनी घेतले कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन
परिवहन मंत्री अनिल परब आज हे कोल्हापुरात आपल्या पत्नी सोबत आले होते. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन त्यांनी घेतले. सकाळी साडेआठ वाजता ते मंदिरात दाखल झाले होते. त्यानंतर मंत्री अनिल परब हे देवीची आरती करूनच मंदिरातून बाहेर पडले. दरम्यान यंदाच्या नवरात्र उत्सवात कोणालाही व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी दर्शन दिले जाणार नाही अशी भूमिका पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी घेतले होते. मात्र याच भूमिकेला हरताळ फासण्याचे काम शुक्रवारी पाहायला मिळाले. दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल अंबाबाई मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांची प्रचंड नाराजी आहे. तसेच व्हीआयपी दर्शन देत असल्याचे समजल्यानंतर भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

कोरोनाचे संकट दूर होऊ दे.. अंबाबाईला साकडे-

यावेळी मंत्री अनिल परब यांच्याशी माध्यमाने संवाद साधला असता, यावर त्यांनी कोरोनाचे संकट दूर होऊ दे असे साकडे श्री अंबाबाईला घातले असल्याचं त्यांनी सांगितलं. तर राजकीय विषयावर बोलण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिला.

मंत्री परब विनामास्क मंदिरात-

परिवहन मंत्री अनिल परब हे मंदिरात विना मास्क असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना केवळ विना मास्क असलेल्या भक्तामुळेच पसरतो का? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. तर सर्वसामान्यांना दर्शनासाठी इ पास बंधनकारक केला आहे. मात्र मंत्री अनिल परब यांनी दर्शनासाठी ही पास काढला होता का? अशी चर्चा देखील मंदिर परिसरात होते.

हेही वाचा - ऑनलाइन बुकिंग करून येणाऱ्या भाविकांनाच मिळणार साईदर्शन, शनिदर्शनासाठी ऑफलाइन पद्धत; वाचा नियमावली

हेही वाचा - जाणून घ्या : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या चतु:श्रुंगी माता व मंदिराचे माहात्म्ये

Last Updated : Oct 8, 2021, 2:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details