कोल्हापूर - श्रावणानिमित्त आज ( Holy Shravanamas ) सायंकाळच्या सुमारास अंबाबाई मंदिरात ( Ambabai Temple Kolhapur ) कुंकूमार्चन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला आज 100 महिलांनी सहभाग नोंदवला. त्यांनी अंबाबाईचा १ हजार वेळा सामुदायिक नामजप करत कुंकूमार्चन केले. अंबाबाई मंदिरतील गरुड मंडपात संपूर्ण परिसरात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सौभाग्य सौख्यदायी श्रीकुंकूमार्चन या धार्मिक विधीचे आज शुक्रवारी श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी अंबाबाई मंदिर ( Ambabai Temple ) येथे आयोजन करण्यात आले होते. ( Ambabai Temple Kumkumarchana )
Ambabai Temple Kolhapur : श्रावणमासानिमित्त अंबाबाई मंदिरात कुंकूमार्चन सोहळा साजरा, कोल्हापुरात भाविकांची गर्दी
आज पासून हिंदू धर्मियांसाठी पवित्र श्रावणमास ( Holy Shravanamas ) सुरू झाला आहे. कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात ( Ambabai Temple Kolhapur ) भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. श्रावण महिन्याची सुरुवात ही आई अंबाबाईच्या दर्शनाने ( Devotees took darshan of Ambabai ) व्हावी अशी, इच्छा प्रत्येक भक्ताची असते. यामुळेच आज स्थानिकांसह राज्यातून देखील अनेक भाविक श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरात आले आहेत. ( Ambabai Temple Kumkumarchana )
अंबाबाईच्या मूर्तीची प्रतिष्ठापना -कोरोना काळात या सोहळ्यावर निर्बंध आले होते मात्र आता कोरोना चे निर्बंध शिथिल झाल्याने आज मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. श्रीकुंकूमार्चन हा धार्मिक विधी मध्ये प्रत्येक शुक्रवारी 100 महिलांना या विधीमध्ये सहभाग घेता येतो. यासाठी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप येथे व्यासपीठावर अंबाबाईच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. शुक्रवारी या विधीचे आयोजन करण्यात येत असते.
पूजन करुन विधीला सुरुवात-पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या उपस्थित पूजन करुन विधीला सुरुवात करण्यात आली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी, पुजारी उपस्थित होते. यावेळी विधीतील सहभागी सर्व महिलांना अंबाबाईच्या पादुका, कुंकू, द्रोण देण्यात आले होते. त्यांनी द्रोणमध्ये पादुका ठेवून त्यावर सलग १ हजार वेळा अंबाबाईचा नामजप करत कुंकूमार्चन केले. या धार्मिक विधीत कोल्हापुरातील विविध भागातील सुवासिनी महिला सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा -Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत, ठाण्यातील न्यायालयात याचिका दाखल