कोल्हापूर - छत्रपती शिवरायांच्या अवमानाविरुद्ध ( Karnatak Shivaji Maharaj Insult ) लढणाऱ्या बेळगावमधील 38 मराठी तरुणांवर राजद्रोहाचा गुन्हा ( Belgaon Youth Charge Sedition ) दाखल झाला आहे. हे तरुण गेल्या एक महिन्यापासून तुरुंगात खितपत पडले आहेत. राष्ट्रपुरुष छत्रपती शिवरायांच्या अवमानाविरुध्द लढणाऱ्या या शिवभक्तांवर राजद्रोहासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची कन्नड प्रशासनाची कृती शिवभक्तांच्या भावनांना ठेच पोहचवणारी आहे. या अन्यायी कारवाई प्रश्री भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील ( BJP Leader Chandrakant Patil ) यांनी लक्ष घालावे, यासाठी त्यांना निवेदन देण्यात आले. कोल्हापूरातील नागरिकांकडून त्यांना हे निवेदन देण्यात आले.
तरुणांवरील राजद्रोहाचा गुन्हा मागे घ्या -
यावेळी चंद्रकांत पाटील यांना निवेदन देताना ते म्हणाले, कर्नाटक राज्यात आपल्या पक्षाचे सरकार असून आपण याप्रश्नी लक्ष घालून कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करावी आणि राजद्रोहाचा गुन्हामागे घेण्याविषयी गांभीर्याने प्रयत्न करावेत. दरम्यान, यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री यांना तातडीने पत्र पाठवून आपल्या भावना कळवितो व प्रत्यक्ष फोन वरून संपर्क साधून हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासनही दिले. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, शशिकांत पाटील, प्रकाश पाटील, प्रताप नाईक, अवधुत पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा -Statue of Shivaji Maharaj Removed : अमरावतीत पुतळ्यांचे राजकारण; शहरासह दर्यापूरमध्ये तणाव