महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोल्हापूर जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांचेही लसीकरण; 'असे' आहे प्रशासनाचे नियोजन

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच 15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण ( children vaccination in Kolhapur ) करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 2 लाख 29 हजार लाभार्थ्यांचा ( Beneficiaries of children vaccination in Kolhapur ) समावेश आहे. त्यामुळे पालकवर्गाची चिंता काहीशी मिटणार आहे.

मुलांचे लसीकरण
मुलांचे लसीकरण

By

Published : Dec 31, 2021, 3:37 PM IST

Updated : Dec 31, 2021, 6:54 PM IST

कोल्हापूर -ओमायक्रॉनचे प्रमाण वाढण्याची शक्यता असताना पालकवर्गासाठी दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यात लहान मुलांचेही कोरोना लसीकरण ( Children corona vaccination in Kolhapur ) होणार आहे. महापालिका क्षेत्रात येत्या 3 जानेवारीपासून लसीकरण सुरू होणार असल्याची माहिती कोल्हापूर आयुक्त कादंबरी बलकवडे ( Kolhapur corporation commissioner on vaccination ) यांनी दिली.

देशभरात 18 वर्षांवरील कोट्यवधी लोकांचे लसीकरण झाले आहे. लहान मुलांचे लसीकरण कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ( Narendra Modi Announcement on children vaccination ) चार दिवसांपूर्वी देशभरातील 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करणार असल्याचे जाहीर केले.

15 ते 18 वयोगटातील मुलांचेही लसीकरण

हेही वाचा-PM Narendra Modi : 15 ते 18 वयोगटातील मुलांना मिळणार लस, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

जिल्ह्यातील एवढ्या मुलांचे होणार लसीकरण - डॉ. साळे

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच 15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 2 लाख 29 हजार लाभार्थ्यांचा समावेश आहे. शाळा तसेच महाविद्यालय सुरू झाल्याने मुले अनेक जणांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न समोर आला आहे. लवकरच त्यांचे लसीकरण होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे ( Kolhapur DHO on children vaccination ) यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-जालना : लहान मुलांच्या लसीकरणाबाबत पंतप्रधानांनी केलेल्या निर्णयाचे स्वागत - राजेश टोपे

येत्या 3 जानेवारीपासून लसीकरण - आयुक्त बलकवडे

दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 15 ते 18 वयोगटातील मुलांचे येत्या 3 जानेवारीपासून ( Childrens Vaccination From 3 January ) करण्यात येणार आहे. या सर्वांना कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात तब्बल 28 हजार मुले या वयोगटातील आहेत. या वयोगटातील मुलांना त्यांच्या शाळेत किंवा महाविद्यालयात लस देण्यात येणार ( Covid Vaccination At Schoolअसल्याची माहिती महापालिकेच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली. शहरात तब्बल 132 शाळा महाविद्यालयात हे लसीकरण होणार ( Vaccination program in Kolhapurs 132 schools ) असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा-Rajesh Tope On Covid : कोरोना रुग्णांच्या संख्येत सात पटीने वाढ होऊ शकते, आरोग्यमंत्र्यांनी वर्तवली भीती

राज्यात साडेपाच कोटी लोकांचे दोन्ही डोस पूर्ण

राज्य सरकार लसीकरणावर ( Covid Vaccination In Maharashtra ) मोठ्या प्रमाणात भर देत आहेत. 29 डिसेंबरच्या आकडेवारीनुसार राज्यात आठ कोटी नागरिकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. राज्यातील नऊ कोटी लोकांचा पहिला डोस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारचे आहे. अजून एक कोटी लोकांचा पहिला डोस शिल्लक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतेच सांगितले. राज्यातील साडेपाच कोटी नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. सामाजिक संस्थांच्या मदतीने घरोघरी जाऊन नागरिकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे.

Last Updated : Dec 31, 2021, 6:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details