कोल्हापूर : तुमच्या घराबाहेर पहारेकरी म्हणून बसू काय? मी राज्याचा भाजप अध्यक्ष आहे. मला राज्यभर फिरावे लागते. असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथे लागलेल्या पोस्टरवर आपली प्रतिक्रिया दिली ( Chandrakant Patil Criticized Opposition ) आहे. कोथरूड येथे विविध ठिकाणी चंद्रकांत पाटील हरवले आहेत, अशा आशयाचे पोस्टर लागले ( Banner In Kothrud Against Chandrakant Patil ) आहेत. त्यावर संतापून चंद्रकांत पाटील यांनी 'हिम्मत असेल तर समोर या डिबेट करू' असे रात्रीच्या अंधारात पोस्टर लावून पळून जाण्याचा काय अर्थ ( Chandrakant Patil Challenge Opposition ) आहे. कोथरूडकरांना तसेच पुणेकरांना मी कोविड काळात काय काम केले आहे हे चांगलेच माहिती असल्याचे त्यांनी म्हटले.
हिम्मत असेल तर समोर या डिबेट करू :पोस्टर लावले यावर विचारले असता ते म्हणाले तिथल्या लोकांना चांगले माहीत आहे मी काय काम केले आहेत. आता सुद्धा फिरते वाचनालय तसेच फिरते रुग्णालय सुरू आहे. ज्याचा अनेकांना फायदा होत आहे. अशी मोठी यादी आहे त्यामुळे हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे ज्यांची हिम्मत आहे त्यांनी कोथरूड च्या चौकात डिबेट करायला यावे. मी काय तुमच्या घराबाहेर पहारेकरी म्हणून काम करत बसू काय? मी राज्याचा भाजप अध्यक्ष आहे. मला राज्यभर फिरावे लागते, प्रवास करावा लागतो. महिन्यातले 16-16 दिवस प्रवास करावा लागतो. त्यामुळे अशा प्रकारे रात्रीच्या अंधारात पोस्टर लावण्यात काय अर्थ आहे. हिम्मत असेल तर चर्चेला या असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, आज पुण्यात विविध ठिकाणी चंद्रकांत पाटील यांचे पोस्टर लागले आहेत. ज्यामध्ये कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे गेल्या महिन्याभरापासून हरवले आहेत असे पोस्टर लागले आहेत त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
Chandrakant Patil : तुमच्या घराबाहेर पहारेकरी म्हणून बसू काय? मी भाजपचा राज्याचा अध्यक्ष आहे : चंद्रकांत पाटील
पुण्याच्या कोथरूड भागाचे लोकप्रतिनिधी असलेले चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात कोथरूडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली ( Banner In Kothrud Against Chandrakant Patil ) आहे. त्यावर चंद्रकांत पाटील हरवले असल्याचे लिहिले आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता 'तुमच्या घराबाहेर पहारेकरी म्हणून बसू काय? मी राज्याचा भाजप अध्यक्ष आहे', अशा शब्दात पाटलांनी उत्तर दिले ( Chandrakant Patil Criticized Opposition ) आहे.
मी अनेक ठिकाणी सुशोभीकरण केले : यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, निवडणुकीत पराभव होणार हे लक्षात आल्यानंतर आता एखादे आमिष दाखवले जाते. लबाडाच्या घरचे जेवण जेवल्याशिवाय खरं नाही हे थेटपाईन बाबत झाले आहे, असा टोला सुद्धा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटलांना लगावला. शिवाय अडचणीत आलो की लोकांना आवडणारे विषय काढायचे असेच आता सुरू झाले आहे. शिवाय शहरातील गार्डन सुशोभीकरण करणार असे सांगत आहेत. मात्र मी पालकमंत्री असताना अनेक ठिकाणी सुशोभीकरण केले आहे, लोकांना याची माहिती आहे. कार्यकर्त्यांना बरे वाटावे म्हणून मी काहीही बोलत नाही पण कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत आमचा विजय होणार यावर आम्ही शंभर टक्के ठाम असल्याचा विश्वास सुद्धा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.