महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 23, 2022, 12:11 PM IST

ETV Bharat / city

Car Accident in Kolhapur : कोल्हापूरमध्ये शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात अपघात; गाडीने घेतला पेट

कोल्हापूरमध्ये शासकीय विश्राम गृह परिसरात एक चारचाकीचा अपघात झाला. शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या भिंतीला चारचाकी गाडीची धडक लागून हा अपघात झाला आहे. (Car Accident in Kolhapur) या धडकेत चारचाकीसह येथील बस स्टॉपचा चुराडा झाला आहे. दि. (23 मार्च)रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

अपघातातील गाडी
अपघातातील गाडी

कोल्हापूर - येथील शासकीय विश्राम गृह परिसरात एक चारचाकीचा अपघात झाला. शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या भिंतीला चारचाकी गाडीची धडक लागून हा अपघात झाला आहे. (Car Accident in Kolhapur) या धडकेत चारचाकीसह येथील बस स्टॉपचा चुराडा झाला आहे. दि. (23 मार्च)रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये हर्ष पुजारी हे जखमी झाले असून, अन्य दोघ किरकोळ जखमी आहेत.

अपघात झाल्यानंतर गाडी

गाडीचा (गाडी क्रमांक MH 12 FN 6549) - शासकीय विश्रामगृहाची दगडी भिंत पडली असून अपघात घडताच गाडीने पेट घेतला. कोल्हापूरच्या एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत विद्यार्थ्यांचे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह होते धैर्य प्रसाद हॉलला लागून असलेल्या रस्त्यावर हा अपघात घडला. या अपघातातील गाडीचा (गाडी क्रमांक MH 12 FN 6549)हा आहे.

बस स्टॉप धडक देत दिल्याने गाडीला आग लागली - गाडी इतक्या वेगात होती की चालकाचा गाडी वरील ताबा सुटल्याने गाडी पहिल्यांदा शासकीय विश्रामगृहाच्या भिंतीला धडकली. तसेच, बाजूलाच असलेल्या बस स्टॉप धडक देत दिल्याने गाडीला आग लागली. त्यानंतर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, गाडीला असलेले चारही चाक तुटून आजूबाजूला पडले आहेत.

हेही वाचा -आपल्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही! - जितेंद्र आव्हाड

ABOUT THE AUTHOR

...view details