कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढत चालले आहेत. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात तब्बल 594 नवे रुग्ण तर 15 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 152 जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे. सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 3 हजार 880 वर पोहोचली आहे. आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 57 हजार 320 इतकी झाली आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -
कोल्हापूरात 594 नवे रुग्ण तर 15 जणांचा मृत्यू
कोल्हापूरात 594 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 57 हजार 320 इतकी झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 57 हजार 320 वर पोहोचली आहे. त्यातील 51 हजार 557 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 ला जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 3 हजार 880 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 1 हजार 883 झाली आहे.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1 वर्षाखालील - 70 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 2099 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 4005 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 30738 रुग्ण
51 ते 70 वर्ष -16290 रुग्ण
71 वर्षांवरील - 4118 रुग्ण
जिल्ह्यात असे एकूण 57 हजार 320 रुग्ण झाले आहेत.
तालुक्यानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1) आजरा - 1043
2) भुदरगड - 1403
3) चंदगड - 1288
4) गडहिंग्लज - 1747
5) गगनबावडा - 169
6) हातकणंगले - 5805
7) कागल - 1807
8) करवीर - 6422
9) पन्हाळा - 2072
10) राधानगरी - 1353
11) शाहूवाडी - 1464
12) शिरोळ - 2706
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 8259
14) कोल्हापुर महानगरपालिका - 18717
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 3062