ठाणे -कल्याण पश्चिमेतील गांधारी नजीक परिसरात एका घरामध्ये दुर्मिळ शॅमेलीयन प्रजातीचा सरडा आढळून आला. संबंधितानी वर्ल्ड रेस्क्यू हेल्पलाइनला ही माहिती दिली. यानंतर वॉर फाउंडेशन या प्राणी मित्र संघटनेच्या कार्यकर्त्या फाल्गुनी दयाल यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन सरड्याला पकडले आणि नैसर्गिक अधिवासात सोडले.
शॅमेलीयन सरडा नामशेष होण्याच्या मार्गावर
सरड्याची शॅमेलीयन ही दुर्मिळ प्रजात असून निसर्ग साखळीत त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. विशेष म्हणजे शॅमेलीय सरड्याची प्रजाती नामशेष होत चालली आहे. त्यातच आज या शॅमेलीयन सरड्याची प्रजात कल्याणात आढळल्याने ही दुर्मिळ घटना असून रंग बदलण्यात हे सरडे तरबेज असल्याचेही माहिती प्राणीमित्र फाल्गुनी हिने दिली आहे.