ठाणे - कोरोना महामारीमुळे नागरिकांची अर्थिक स्थिती डबघाईस आली असतानाच महावितरणाने वीज ग्राहकांना अवाच्या-सव्वा वीजबिले आकारून नागरिकांवर मोठा अर्थिक बोजा लादला आहे. वीजबिले माप करण्यासाठी आज कल्याणात मात्र भाजप आमदारासह कार्यकर्त्यांनी वीजबिले माफ करावीत, याकरिता सरकारचा निषेध म्हणून कल्याणातील महावितरण कार्यालय असलेल्या 'तेजश्री' समोरच वीजबिलांची होळी केली. यावेळी मात्र बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांशी आमदारासह कार्यकर्त्यांनी हुज्जत घालून धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निमार्ण झाले होते.
कल्याणच्या भाजप आमदाराची वीजबिल आंदोलनावरून पोलिसांशी धक्काबुक्की; परिसरात तणाव
कोरोना महामारीमुळे नागरिकांची अर्थिक स्थिती डबघाईस आली असतानाच महावितरणाने वीज ग्राहकांना अवाच्या-सव्वा वीजबिले आकारून नागरिकांवर मोठा अर्थिक बोजा लादला आहे. वीजबिले माप करण्यासाठी आज कल्याणात मात्र भाजप आमदारासह कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयासमोरच वीजबिलांची होळी केली.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या आर्थिक होरपळीतून नागरिक सावरले नाहीत. अशा परिस्थितीत आलेली ही भरमसाठ वीजबिले भरणे नागरिकांना केवळ अशक्य आहेत. वीजबिले माफ करावीत याकरिता भाजपाच्या वतीने अनेक वेळा राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच आंदोलनात्मक भूमिका घेतली गेली आहे. परंतु तरी देखील राज्य सरकार नागरिकांकडून जबरदस्तीने वीजबिले वसुली करण्याचा अट्टाहास करत आहे. त्यामुळे हे ठाकरे सरकार गुन्हेगारांचे व दडपशाहीचे असून आमच्यावर दंडूकेशाहीने वागत असल्याचा आरोप यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी केला.