औरंगाबाद - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) औरंगाबादला आल्यास त्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ) यांनी म्हटले आहे. पुढे बोलतांना जलील म्हणाले की, मला असं वाटतं की ज्या प्रकारची राजनीती आपण या महाराष्ट्रामध्ये बघत आहे, ती आतापर्यंत कधीही पाहिली नाही. सध्या काय काय प्रयोग करण्यात येत आहेत सगळे पाहत आहेत. आपल्याला वाटते की हा आमदार आज यांच्यासोबत गेले त्यांच्या सोबत हे, कुणाला कुणालाही विश्वास राहिलेला नाही. मी दिल्लीमध्ये सांगितलं आहे की, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान एकमेकांना भेटायला गेले होते. त्यांना माहित होतं की अफजल खान काय करणार आहे. ( Committee Against Aurangabad Name Change)
Imtiaz Jalil : मुख्यमंत्री शहरात आल्यास काळे झेंडे दाखवणार - इम्तियाज जलील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांना एमआयएम काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ) यांनी दिला आहे. शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून औरंगाबाद नामकरण विरोधी सर्व पक्षीय समितीच्या बैठकीत ( Committee Against Aurangabad Name Change) निर्णय घेण्यात आल्याची माहिती जलील यांनी दिली.
कोण कोणाला मारेल याचा भरवसा नाही -हे नेते हसताना दिसत आहेत. मात्र प्रत्येकाच्या हातात खंजीर आहे. कोण कोणाला मारेल याचा भरवसा नाही. मंत्री मंडळ विस्तार होऊ द्या सगळ कळेल कोण कोणाचे कपडे फाडेल ते दिसून येईल अशी टीका खा इम्तियाज जलील यांनी केली. मंत्री मंडळ विस्तारावरून टीका करत दोघांचे मंत्री मंडळ हे जगातले सर्वात अदभुत मंत्रीमंडळ आहे. ज्यांना कुबड्याची गरज असते ते युतीकरतात कोणीही येऊद्या आम्ही एकत्र सक्षम आहोत अशी टीका जलील यांनी केली.
हेही वाचा -Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत, ठाण्यातील न्यायालयात याचिका दाखल