महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महाराजांची जयंती एकाच दिवशी साजरी करा, सेना आमदारांची सरकारकडे मागणी

19 महाराजांची महाराजांची जयंती तारीख निश्चित करून महाराजांची जयंती तारीख निश्चित करून, त्याच दिवशी जयंती साजरी करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. त्यावरूनच आता शिवसेना आमदारांनी देखील भूमिका मांडायला सुरुवात केली आहे.

shivsena press
सेना आमदारांची सरकारकडे मागणी

By

Published : Feb 15, 2022, 4:39 PM IST

औरंगाबाद -19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करावी अशी भावना सर्वत्र दिसून येत आहे. त्यात आता शिवसेना आ. अंबादास दानवे यांनी शिवजयंती एकाच दिवशी साजरी करायला हवी यासाठी आपण सरकारकडे मागणी करणार असल्याचं सांगितलं आहे. जनतेच्या मताशी सहमत असून जयंती तिथीनुसार करा किंवा तारखेनुसार मात्र जयंती एकाच दिवशी साजरी व्हावी असं मत त्यांनी व्यक्त केलं.

आमदारांची सरकारकडे मागणी
शिवसेना बदलणार भूमिका?
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसारच साजरी करावी अशी भूमिका शिवसेनेने याआधी अनेक वेळा मांडली आहे. मात्र या भूमिकेत आता बदल होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. 19 महाराजांची महाराजांची जयंती तारीख निश्चित करून महाराजांची जयंती तारीख निश्चित करून, त्याच दिवशी जयंती साजरी करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. त्यावरूनच आता शिवसेना आमदारांनी देखील भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि अंबादास दानवे यांनी महाराजांची जयंती एकाच दिवशी साजरी करावी अशी मागणी करणार असल्याचं सांगितलं. जनतेच्या भावानेचा आदर करून आपण जयंती आजारी करणार आहोत. जयंती तिथीनुसार किंवा तारखेनुसार असे कोणत्या तरी एकाच दिवशी साजरी करा, अशी मागणी सरकारकडे करणार असून सरकार जो निर्णय घेईल तो मान्य असेल अशी भूमिका आ अंबादास दानवे यांनी सांगितली.


शिवजयंतीला शिवसेनेतर्फे भरघोस कार्यक्रम
यावर्षी शिवसेनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त भरघोस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई आणि चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाची सुरुवात करण्यात येणार आहे. 15 फेब्रुवारी पासून सलग तीन दिवस शहरात तब्बल 36 शिवमशाल एकाच रथावरून क्रांती चौकात पोहोचतील. यांचे नेतृत्व युवासेना करणार आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी ढोल पथक मानवंदना देणार आहे. तर रोज सायंकाळी चार वाजता महाअभिषेक आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होईल. या प्रमाणे विविध कार्यक्रम हे आयोजित केले असून, पाच दिवस रोज वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून यंदाचा शिवजयंती महोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करणार असल्याची माहिती आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे.
हेही वाचा -Hijab controversy : कोणी काय घालायचं हे ज्याचं त्याला ठरवू द्या, हिजाब प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details