महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोन जणांना बेड्या, दोन पिस्तुलासह एक काडतूस जप्त

निवडणुकीच्या काळात काही घातपात घडविण्याचा प्रयत्न होता का, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

By

Published : Apr 20, 2019, 7:04 PM IST

औरंगाबाद - अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्या दोन जणांना गंगापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल, एक काडतूस आणि गावठी कट्टादेखील पोलिसांनी जप्त केला आहे. अशोक संबळे आणि नामदेव भुसारे, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गंगापूर तालुक्यातील मुद्देश वाडगाव येथे रात्रीच्यावेळी गस्तीला असलेल्या पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी भुसारे वस्तीत सापळा रचून आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपीच्या घरातून पिस्तूल, गावठी कट्टा आणि काडतुसे जप्त केली आहेत.आरोपींवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या काळात काही घातपात घडविण्याचा प्रयत्न होता का, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. तसेच ही शस्त्रे आरोपींनी कोठून आणली, याचा तपासदेखील सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details